Thursday, November 21, 2024
Homeबातम्यामयुरी शाह सन्मानित

मयुरी शाह सन्मानित

सध्याच्या संगणकीय व इंटरनेटच्या धावत्या युगात आपल्या व समाजाच्या आदर्श कुटुंब व्यवस्थेसाठी झटणाऱ्या, धार्मिकतेची, सामाजिक कार्याची आवड व त्यासाठी अविरत कार्यरत असलेल्या, त्याच बरोबर आदर्श कुटुंब व्यवस्थेसाठी कुटुंबाबरोबर मुलाला चांगल्या सवयी लावून शिस्त लावणाऱ्या, (आज मुलगा यश शिक्षणाबरोबरच, आंतरराष्ट्रीय पातळीवर बॅडमिंटन चा मानांकित खेळाडू असून आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करतोय) नगरच्या सौ मयुरी शहा यांचा नुकताच पुणे येथे कोल्हापूरच्या अविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फॉउंडेशनच्या वतीने भव्य सभारंभात “आदर्श माता” पुरस्काराने सन्मान करण्यात आला. शाल, श्रीफळ व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मयुरी शाह यांच्या रक्तदानाच्या कार्याचा यावेळी संयोजकांनी विशेष उल्लेख केला, कारण सौ मयुरी यांचा अनन्यसाधारण असा O+ रक्तगटाचे महत्व ओळखून गरजू रुग्णांसाठी २८ वेळा रक्तदान करून अनेक गरजूंच्या आयुष्यात नवसंजीवनी देऊन त्यांनी समाजाला एक चांगला अनुकरणीय संदेश देण्याचे कार्य केले आहे त्याबद्धल कौतुक केले.

या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध लेखक व दिग्दर्शक सुरेश पाटोळे, “कर्मवीरांण” या चित्रपटाचे दिग्दर्शक धनंजय भावलेकर “यशदा” पुणे चे मार्गदर्शक विवेक गुरव, बार्शी येथील स्मार्ट स्पीच अकादमीचे संचालक सचिन वायकुळे, ‘अविष्कार’चे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार, पुणे जिल्हा शाखाध्यक्ष प्रकाश चौधरी, महासचिव विलास आंबेकर, डॉ.संतोष भोसले, पवनकुमार पवार व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला ‘अविष्कार’ चे राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार यांनी सर्वांचे स्वागत करून पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. तसेच ज्ञानज्योती, आदर्श माता व जिजाऊ माता राज्यस्तरीय पुरस्काराच्या मागील भूमिका विशद केली.
ते म्हणाले की, अनेक वर्षांपासून आम्ही असे पुरस्कार देत असून समाजाप्रती आपले काही देणे लागते त्याला अनुसरून आदर्श व अनुकरणीय असे अमूल्य कार्य करणाऱ्या व्यक्तींना, मातांना आम्ही अश्या विशिष्ट पुरस्कारांनी सन्मानित करतो. आज पर्यंत आम्ही ज्यांना पुरस्कारांनी सन्मानित केले असून त्याचे अनुकरण इतरांकडून व्हावे, यातून समाजाचा उत्कर्ष वाढावा त्याच्या या समाज कार्याचा गौरव व्हावा हि साधी, सरळ अशी यामागील भावना असून पुरस्कार जाहीर करताना त्या व्यक्तीच्या कार्याचा कसोशीने अभ्यास करूनच तो जाहीर केला जातो असे सांगून आपल्याही असेच आदर्श कार्य घडो अशी अपेक्षा व्यक्त केली.

पवनकुमार पवार यांनी आभार मानले. या कार्यक्रमास राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मानाच्या अश्या पुरस्काराचे मानकरी झाल्याबद्धल सौ मयूरी शाह यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. सौ.मयुरी या जेष्ठ वृत्त छायाचित्रकार अनिल शहा यांच्या सुविध्य पत्नी आहेत.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. Nice inspiring news with photo. Put it deva and alkatai.mayuri also pleas to see this news she.send it to many of her group. Thanks again .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments