Saturday, December 21, 2024
Homeबातम्यामराठी कविता गिनीज बुकमध्ये हवी - प्रा विसुभाऊ बापट

मराठी कविता गिनीज बुकमध्ये हवी – प्रा विसुभाऊ बापट

आपल्या “कुटुंब रंगलंय काव्यात” या कवितेच्या बहारदार कार्यक्रमाने जगप्रसिद्ध असलेल्या, प्रा विसुभाऊ बापट यांची मुलाखत नुकतीच नवी मुंबईतील नवे शहर या यू ट्यूब चॅनल वर प्रसिध्द झाली आहे. ही मुलाखत पत्रकार श्री राजेंद्र घरत यांनी घेतली आहे.

प्रा विसुभाऊ बापट यांचे आता पर्यंत “कुटुंब रंगलंय काव्यात” या कार्यक्रमाचे ३ हजार ११२ कार्यक्रम झाले आहेत. विसुभाऊंची स्मरणशक्ती आणि सादरीकरणाची कला खरोखरच आपल्याला विस्मयचकित करणारी आहे.

प्रा विसुभाऊ बापट यांनी आपल्या न्युज स्टोरी टुडे या आपल्या वेबपोर्टल वर लिहिलेले “कुटुंब रंगलंय काव्यात”
चे ५२ भाग ही लोकप्रिय ठरले आहेत. या लेखनावर आधारित पुस्तक विचाराधीन आहे.

विसुभाऊंची मुलाखत आपण पुढील लिंक वर क्लिक करून पाहू शकता.

आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. आदरणीय विसुभाऊंनी सर केले
    कवितेच्या कार्यक्रमातून एव्हरेस्ट शिखर
    उन उन खिचडी सारखे लाजवाब सादरीकरण
    ऐकताना येतो आनंदाला बहर

    वेगवेगळ्या वयोगटातील रसिकांसाठी
    बोलले विजुभाऊ सतत पंधरा तास
    अत्यंत तळमळीने व आवडीने घेतला
    विजुभाऊंनी मराठी कवितेचा ध्यास

    गदिमा, कुसुमाग्रज,शंकर वैद्य अशा दिग्गजांनी
    केलं भरभरून कौतुक विसुभाऊंचं
    कविता रसिकांपर्यंत पोहचवणं
    फार मोठं मोलाचं कार्य आहे विसुभाऊंचं

    अतिशय सुंदर मुलाखत
    वाटतं ऐकत रहावं सतत
    खूप खूप अभिनंदन विसुभाऊ
    गुणगान तुमचे सदैव गात राहू

    राजेंद्र वाणी
    दहिसर मुंबई.
    मो.9321951447

  2. विसूभाऊ बापटांची मुलाखत लागोपाठ ३-४ वेळा ऐकली. मी त्यांचे कार्यक्रम खूपवेळा ऐकलेत आणि त्यांच्या अचाट स्मरणशक्तीपुढे नतमस्तक झाले आहे. मराठी एम्. ए. करणाऱ्यांना सुद्धा मराठी काव्याचे इतके प्रकार सांगता येणार नाहीत ते सगळे प्रकार विसुभाऊ एकादमात न अडखळता सांगतात. कुठलाही बडेजाव नाही, साथीदार नाहीत, एजंट नाहीत तरी लिमका बुक मधे नोंद झालेला हा कार्यक्रम कुटुंब रंगलंय काव्यात सगळ्यांनी जरुर पहावा. मुलाखत छानच झाली. उत्तम प्रश्न विचारुन चपखल उत्तरं मिळवण्यात मुलाखतकार घरत यशस्वी झालेत. धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर, ठाणे on “माध्यम पन्नाशी” १७
Purnima anand shende on निसर्गोपचार : ३
Manisha Shekhar Tamhane on निसर्गोपचार : ३