आता वय वाढले आणि जबाबदारी ही
माणसाच्या वाट्याला येणार ही बाब खरी
वय विसरून अंकातले जरी
वैचारिक मंथन वय अनुभव तरी
वयाच्या अवघ्या पन्नाशीत खरे
साथीदार जोडीला असणे बरे
ताणतणाव दूर होतील हीच अपेक्षा
प्रत्यक्षात मात्र होऊ नये उपेक्षा
देवा किती कुठवर वेड्या घेशील परीक्षा
मानवी जन्म न वाटो रे शिक्षा
मेंदूच्या पेशी थकतात
रक्त नसा अडकतात
हृदय बीपी शुगर आजार बळावतात
शरीरगात्रे पार जाम होतात
कुणी वेडी म्हणो पण विचार गोळा होतात
लेखन वाचन हक्क हिरावून घेतात
शिकून अधिकारी पदावर विराजमान व्हायचं आहे स्वप्न साकारतात लेकी भगिनी
त्यावेळी नेमके काय अडथळे स्वतः हून आडवे येतात
दोष नसताना ही खोटे आरोप, विचारणा करण्यात ध्येयापासून दूर करतात
बाई बाई अरेच्चा इतकी शिकली म्हणत
तिजवर कुणी उगीच का असेल जळत
उत्तर शोधतेय सापडले तर उत्तम नाही तर शोध संशोधन अविरत.

– रचना : कविता बिरारी. नाशिक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800