१. बापू
सत्य अहिंसेने लोकांना घडविले तुम्ही बापू
शांतीच्या मार्गाने इंग्रज पळविले तुम्ही बापू
चालत होता कायद्यात अन कायद्यात राहूनी
सत्याग्रह शांतीने होते लढविले तुम्ही बापू
केल्या वाटा खुल्या, तोडल्या बेड्या परतंत्र्याच्या
जनात स्वातंत्र्याची मशाल जगविले तुम्ही बापू
परदेशी मालावर सा-या बहिष्कार करताना
मनास खादीकडे खरे तर वळविले तुम्ही बापू
इमानदारी सामंजस्याने प्रश्न सोडून सारे
स्वतंत्र देशाचे राष्टृध्वज चडविले तुम्ही बापू
— रचना : अनिसा सिकंदर. पुणे
२. राष्ट्रपिता
स्वतंत्र भारताचे भाग्यविधाते गांधी आमचे बापू
वंदन त्यांना हो..
जातीभेद नष्ट करुनी प्रेम साऱ्यांना दिधले
अशक्य ते शक्य करुनी उद्योगहित जगा दाविले
बंधू प्रेम मंत्र देऊन त्यांनी आम्हा जागविले
सत्य अहिंसेची देऊन शक्ती निडर आम्हा केले
या भारताचे भाग्यविधाते गांधी आमचे बापू
वंदन त्यांना हो.
दीन दलित गरीब अस्पृश्य अन देशासाठी झटले.
कष्टले, झटले, झगडले ज्योतीसम जगले
मिळवूनी स्वातंत्र्य राष्ट्रास प्रकाशले
वैष्णव जनांचे जणू कैवारी बनले
या भारताचे भाग्यविधाते गांधी आमचे बापू
वंदन त्यांना हो…
बालकाचे काका ते देश-विदेशी प्रिय झाले
सार्यांचे आवडते बापू हे राष्ट्रपिता बनले
भारतभूच्या लेकरांना खेड्याकडे घेऊन निघाले. तिरंगी राष्ट्रध्वजाचा ते अभिमान ठरले
या भारताचे भाग्यविधाते गांधी आमचे बापू
वंदन त्यांना हो….

— रचना : सौ अनिता व्यवहारे. श्रीरामपूर
३. महात्मा गांधी
स्वातंत्र्याचा कैवारी, कर्मयोगी
सत्य, अहिंसा, अपरिग्रह
“खेड्याकडे चला” दिले मूल्यांचे शिक्षण
स्रियांना केले सामिल चळवळीत
ओलांडला ऊंबरठा बाईने
उतरली स्वातंत्र्याच्या चळवळीत
केले स्री धन दान देशासाठी
आधी केले मग सांगितले
संतांचा चोखळला मार्ग
सर्वधर्म प्रार्थनेतून जोडला मानव
मानवता, शांती, रामराज्याचे स्वप्न
वास्तवात ऊतरवण्यासाठी झटले
ग्रामस्वराज्य आजही चाले तुमच्या नावे
अफ्रिकेला दावला मार्ग
जगी तुमच्या तत्वांना मानती सारे
कोणत्याच शस्राने मरत नसतात गांधी
महात्मा गांधी आजही वावरतात आपल्यात
भारताच्या तत्वज्ञानात अनमोल गांधी
— रचना : अंजली सामंत. कैरो, इजिप्त.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800