थोर समाजसुधारक, विचारवंत, लेखक महात्मा फुले
(पूर्ण नाव:जोतीराव गोविंदराव फुले, जन्म:११ एप्रिल १८२७. निधन :२८ नोव्हेंबर १८९०) यांची आज पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने त्यांना केलेले हे काव्यरुपी अभिवादन.
१. हे क्रांतीसुर्या
हे क्रांतीसुर्या
महा मानवा नमो
हे ज्ञान सुर्या ॥१॥
हे क्रांतीसुर्या
शिक्षण ज्ञान यज्ञा
हे नमो सुर्या ॥२॥
हे क्रांतीसुर्या
उध्दारक तू ज्योती
समाज आर्या ॥३॥
हे क्रांती सुर्या
हे दलितोध्दारका
हे महासुर्या॥४॥
हे क्रांतीसुर्या
समता मानवता
सत्याच्या सुर्या ॥५॥
हे क्रांतीसुर्या
शेतकरी उध्दारा
स्री मान सुर्या ॥६॥

– रचना : पंकज काटकर. काटी, जि.उस्मानाबाद
२. सत्यशोधक फुले
सत्यशोधक फुले
अज्ञानी कळ्या फुलविल्या
घेऊन सावित्री संगे
ज्ञानबागा खुलविल्या
हौदाच्या पाण्यावर
तहान भागवण्यासाठी
दलितांच्या उद्धारासाठी
मनाचा गाभारा क्रुतीशीलतेसाठी
न कधी डगमगले
प्रथम स्त्रीशिक्षणाच्या प्रारंभी
पुणे माहेरघर विद्येचे
पत्नीच शिक्षिका आरंभी
शेतकऱ्यांचा आसूड ब्राह्मणांचे कसब
महान विभूती म्हणजे ग्रंथलेखन
विधवाविवाह बालविवाह रोखण्यासाठी आयुष्य अर्पण
शोध स्वतःचाच सत्यशोधक फुले
चरणी नतमस्तक होऊन मागणे कळे
महात्मा पद खरं तर लागू पडे
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंच्या सहचारिणी सह शिक्षणाचा छंद जडे

– रचना : कविता बिरारी. नाशिक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800