Monday, July 14, 2025
Homeसाहित्यमहानुभावांचे योगदान ( 24 )

महानुभावांचे योगदान ( 24 )

प्रसाद प्राप्त झाल्यास प्रसाद वंदनाने जसे तसे गोमटे लाभते.

पुढील पद्धतीने प्रसाद प्राप्त केल्यास, त्या प्रसाद वस्तूत ईश्वराची प्रसन्नता राहत नाही व प्रसाद वंदनाचे गोमटेही लागत नाही.
१) आग्रह करून मागितले असता, प्रसाद वंदनाचे गोमटे नाही.
२) पुढीलास नाराज करून घेतल्यास प्रसाद वंदनाचे गोमटे नाही.
३) भांडून घेतल्यास प्रसाद वंदनाचे गोमटे नाही.
४) चोरून घेतल्यास प्रसाद वंदनाचे गोमटे नाही.
५) विकत घेतल्यास प्रसाद वंदनाचे गोमटे नाही .

प्रसादांचे प्रकार-:
पाच अवतारांपैकी श्रीगोविंद प्रभू व सर्वज्ञ श्री चक्रधरप्रभू या दोन अवतारांच्याच प्रसादरूप वस्तू प्रसादामध्ये आलेल्या आहेत. त्या प्रसादांचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत.
अ) मूर्तीनिष्ठ प्रसाद
ब) विशेष संबंधाचे प्रसाद

मूर्तीनिष्ठ प्रसादामध्ये
१) नख २) दाढ ३) केश कळाप ४) अनुलेपन या चार वस्तूंचा समावेश होतो.

विशेष संबंधाच्या प्रसादामध्ये
१) कापूस २) कोसला ३) रोम ४) चर्म ५) धातू ६) दात ७) काष्ट ८) पाषाण या आठ प्रमुख वस्तूंचा समावेश होतो.

आता या आठ प्रमुख वस्तूंमध्ये प्रामुख्याने ज्या ज्या वस्तूंचा समावेश होतो, ते आपण पाहू या….
१) कापूस-: या प्रकारात सुती वस्त्रांच्या समावेश होतो. ती वस्त्रे पुढीलप्रमाणे आहेत.
१) अंगी २) टोपरे ३) बहिर्वास ४) फुटा ५) पडदणी  ६) पासवडी ७) पासोडा ८) औदास्याची दुटी ९) परसनायकाची दुटी १०) गदोनायकांच्या पत्नीने दिलेले वस्त्र ११) दोन करड्या रंगाचेखळीचे वस्त्र
१२) गोगो नावाच्या भक्ताने दिलेले वस्त्र
१३) कुऱ्हा येथील मातांगाने श्रीप्रभुंना दिलेले त्रिवडी वस्त्र १४) द्राविड देशातल्या ब्राह्मणांने श्रीप्रभुंना दिलेले वस्त्र १५) जोगनायकाचे वस्त्र १६) उत्तरी १७) जानवे १८) पविते १९) जुना पाट २०)नवा पाट
२१) गादीतील कापूस

२) कोसला -: या प्रकारात रेशमी वस्त्रांचा समावेश होतो . ती पुढीलप्रमाणे आहेत.
१) बारवेची दुटी २) म्हाइंभटांनी श्रीप्रभुंना अर्पण केलेली मेघवर्णी दुटी ३) मेघवर्णी पागोटे
४) सर्वज्ञांनी मालगंठीच्या प्रसंगी नेसलेला सोने सळा फुटा (उपरणे) ५) क्षीरोदक फुटा ६) सारनेरा फुटा
७) म्हाळाइसाने अर्पण केलेल्या वस्त्राची किनार, ती रेशमी होती ८) गरुडनीळ दुटी.

३) रोम-: या प्रकारात प्राण्यांच्या
केसांपासून तयार केलेल्या वस्त्रांचा समावेश होतो. ती पुढील प्रमाणे आहे.
१) पंचरंगी घोंगडे २) सौराष्ट्र प्रांतातून आणलेले घोंगडे
३) चवरी ४) साधे घोंगडे ५) सकलादेशी टोपी. (क्रमशः)

प्रा डॉ विजया राऊत

– लेखन : प्रा डॉ विजया राऊत. नागपूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments