Home साहित्य “महानुभावांचे योगदान”

“महानुभावांचे योगदान”

0

समारोप
“महानुभावांचे योगदान” या लेख मालेचा आज समारोप होत आहे.
अतिशय साध्या, सोप्या, रसाळ भाषेत मराठी साहित्याच्या अभ्यासक प्रा डॉ विजया राऊत, नागपूर यांनी मराठी भाषा, साहित्य, स्त्री पुरुष समानता, जाती प्रथा निर्मूलन, सामाजिक सुधारणा, उपासना पद्धती असे विविध पैलू या २६ भागांच्या लेखमालेतून आपल्या पुढे मांडले आहेत. वाचकांनी याचे स्वागत केले या बद्दल वाचकांचे आणि डॉ विजया राऊत मॅडम यांचे तसेच या लेखनासाठी योग्य समन्वय साधूला, त्या श्री हरिहर पांडे, नागपूर यांचेही मनःपूर्वक आभार. डॉ विजया राऊत मॅडम यांच्या पुढील लेखनास हार्दिक शुभेच्छा .
– संपादक

सर्व रसिक वाचकांना माझा दंडवत. माझे महानुभाव पंथाविषयीचे सदर आपल्या वाचकांपुढे सादर करण्यामागे एकमेव हेतू असा होता की अनेक पंथ हिंदू समाजात पाहायला व वाचायला मिळतात. त्यातील महानुभाव पंथ कसा वेगळा आहे.  हे मला सादर करावयाचे होते.

मुळात महानुभाव पंथ हा माझ्या लग्नाच्या आधी मला अपरिचित असाच होता. फक्त शिक्षण घेत असतां या पंथाविषयीची ओळख होती. परंतु लग्न झाल्यानंतर एका महानुभाव पंथाच्या घरी माझा प्रवेश झाला. या पंथाविषयी तेव्हापासून अधिक जवळीक निर्माण झाली. माझ्या घरचे म्हणजे सासरकडील सर्व मंडळी यांना या पंथाविषयी अधिक गोडवा होता, हाच गोडवा माझ्यामध्ये सुद्धा हळूहळू निर्माण झाला. आणि कालांतराने हा पंथ मला आवडू लागला. या पंथाविषयी आस्था निर्माण झाली. आणि या पंथाचा अभ्यास करण्याची आवश्यकता निर्माण झाली.

मुळात मी पेशाने एक प्राध्यापक आहे .त्यामुळे नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात हा पंथ अभ्यासला आहे. तसा माझा अभ्यास सुरू झाला, आणि हळूहळू पंथाविषयीचे बारकावे लक्षात येऊ लागले. हा पंथ जनसामान्यांना कळावा आणि या पंथाचा प्रचार व प्रसार होण्याकरिता न्यूज स्टोरी टुडे ह्या वेबपोर्टलचे संपादक श्री देवेंद्र भुजबळ यांच्याशी ओळख झाली. योगायोगाने सर सुद्धा महानुभाव पंथाचे असल्याने महानुभावांविषयीच्या संदर्भातील माहिती पोर्टलवर प्रकाशित करण्याची विनंती सरांनी केली. मी या पोर्टलवर “महानुभाव पंथाचे योगदान” याविषयी लिहायला लागली. एकूण २६ भागामध्ये मी हा पंथ समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि अनेक विषयाच्या अनुषंगाने या पंथाची माहिती या पोर्टलवर टाकण्याचा प्रयत्न केला. याकरिता श्री देवेंद्र भुजबळ आणि त्यांची पत्नी सौ अलका यांनी आपल्या पोर्टलवर या पंथाविषयी सदर सुरू केले आणि महानुभाव पंथाच्या साहित्य वाचकांसमोर ठेवण्याची संधी मला उपलब्ध झाली.

मी खरोखरच अतिशय भाग्यवान आहे की मला ही संधी मिळाली. ही संधी मिळाल्याबद्दल श्री भुजबळ सरांचे मनापासून आभार ! आपण सर्व वाचकांनी अगदी मनापासून माझं लेखन वाचले, त्याचं कौतुक केलं, भरभरून शुभेच्छा आणि आशीर्वाद दिलेत त्याबद्दल आपणा सर्वांचेही खूप खूप आभार !

या प्रवासात सगळ्यात मोठा आनंद खरंतर माझ्याच वाट्याला आला आहे. कारण महानुभावांचे योगदान या सदराचे लेखन करतांना मला महानुभव साहित्य अधिक वाचायला व समजायला मिळाले. या नव्या परिचयाचे कारण म्हणजे मी पूर्वीपेक्षा बुद्धीने, विचाराने अधिक परिपक्व झाले आहे. मनाने, संवेदनेने अधिक हळवी झाले आहे. माझ्या साहित्याला या पोर्टलवर अधिक प्रेम मिळाले, असे उपक्रम राबविणारे श्री भुजबळ सर यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते आणि आशा करते की अशा पद्धतीचे माझे पुढील लेखन या वेबपोर्टलवर प्रकाशित होईल.
खूप खूप धन्यवाद.

प्रा डॉ विजया राऊत

– लेखन : प्रा डॉ विजया राऊत. नागपूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version