Sunday, March 16, 2025
Homeबातम्यामहाबळेश्वर येथे कापडी पिशव्यांची कार्यशाळा

महाबळेश्वर येथे कापडी पिशव्यांची कार्यशाळा

महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद (स्वच्छ सर्वेक्षण २०२३, माझी वसुंधरा)  व नेस्ले प्रणीत हिलदारी अभियाना अंतर्गत  नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी महिला (सफाई मित्र) व बचतगटातील महिला यांच्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षणाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

हिलदारी अभियाना अंतर्गत स्त्री मुक्ती संघटना व रीसिटी हे ‘वेस्ट वर्कर प्रोफेशनलायझेशन’  च्या अनुषंगाने शहराच्या स्वच्छतेत महत्वाची भूमिका निभावणारे नगरपरिषद, सफाई कर्मचारी व बचगट महिला यांच्यासाठी  विविध उपक्रम राबवीत आहेत.

नगरपरिषदेचा बचतगट व शहरातील इतर महिलांच्या बचतगटा सोबत काम करतांना त्यांना उत्पन्नाचा एक स्रोत उपलब्ध व्हावा व प्लास्टिक बंदीवर उपाय म्हणून  कापडी पिशवी बनविण्याची कार्यशाळा “माणदेशी” च्या सहकार्याने संपन्न झालील. यात सौ. ज्योती जाधव व सौ. सविता बनकर यांनी महिलांना चार प्रकारच्या कापडी पिशवी बनविण्याचे प्रशिक्षण दिले.

यामध्ये टिफिन बॅग, बाजारला वापरण्यात येणारी कापडी पिशवी, वन साईड हँड बॅग, (पर्स), पेन पाऊच बॅग इत्यादी प्रकारच्या कापडी पिशवी बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. कापडी पिशवी बनविण्यासाठी कोणते कापड वापरावे, कोणत्या प्रकारची पिशवी बनवितांना कापडाची कटिंग कशी करावी, माप कसे घ्यावे, पेन पाऊच पिशवी बनवितांना त्या पिशवीला चेन कशी लावावी, आवश्यक साहित्य, त्याचे फायदे याबाबत सविस्तर माहिती दिली तसेच याबाबतचे  प्रात्यक्षिक दाखवून महिलांकडून कापडी पिशव्या  तयार करून घेण्यात आल्या.

प्रशिक्षणा दरम्यान उपस्थित महिलांच्या शंकांचे निरसन करून मार्गदर्शन करण्यात आले. सदर व्यवसायासाठी आवश्यक असणारे कापड, मार्केटिंग व विक्री याबाबत हिलदारी अभियाना अंतर्गत “माणदेशी”  च्या सहकार्याने  करण्यात येईल याबाबत आश्वस्त केले.

या प्रशिक्षणाचा लाभ ३२ बचतगटातील महिलांनी घेतला. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिलांना भारत सरकारच्या अर्थ  मंत्रालयाद्वारे स्थापित राष्ट्रीय  कौशल्य विकास महामंडळाचे  (NSDC) प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.

सदर प्रशिक्षण घेतल्यानंतर महिलां प्रतिक्रिया देतांना म्हणाल्या की, “कापडी पिशवी बनविणे सोप्पे आहे. आम्हाला शिलाई मशीन चालवत येत असल्यामुळे आम्हाला नवीन रोजगार मिळू शकतो. बाजारामध्ये वेगवेगळ्या कापडी पिशव्या खूपच महाग असतात. परंतु आम्ही स्वतः शिकून कापडी पिशवी बनवली तर ती खूप स्वस्तात तयार होते. आणि सध्या शहरामध्ये प्लस्टिक बंदी चालू आहे. तर हा उत्तम पर्याय आहे. कापडी पिशवी वापरणे आम्हाला हिलदारी, नगरपरिषद व माणदेशीच्या वतीने मार्केट उपलब्ध करून दिले तर आम्ही ही कापडी पिशवी घरबसल्या देखील बनू शकतो. व आम्हाला एक छोटासा नवीन रोजगार देखील उपलब्ध होईल. आमच्यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन केल्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार व्यक्त करतो.”

या प्रशिक्षणा मध्ये महाबळेश्वर शहरातील स्टार महिला बचतगट, चांदबी महिला बचतगट, मुमताज महिला बचतगट, मुस्कान महिला बचतगट, खुशबू महिला बचतगट, प्रेरणा महिला बचतगट, व नगरपरिषदेचे नारीशक्ती महिला बचतगट, संत गाडगेबाबा महिला बचतगट इत्यादींचा सामावेश होता.

सदर प्रशिक्षणासाठी महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक पल्लवी पाटील यांचे मार्गदर्शन तर मुख्य लिपीक आबा ढोबळे, रोहित आतवडकर, किरण ढेबे, सचिन दिक्षित वैभव साळुंके यांचे सहकार्य लाभले.

उपक्रम यशस्वी होण्यासाठी हिलदारीचे डॉ मुकेश कुळकर्णी, राम भोसले, प्रतिमा बोडरे, सुजित पेंडभाजे, खाकसारली पटेल, फैयाज वारूनकर, अमृता जाधव, अंकिता गावडे, आर्तिका मोरे, गौरी चव्हाण यांनी परिश्रम घेतले.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments