Saturday, May 31, 2025
Homeसाहित्य"महाराणा प्रताप"

“महाराणा प्रताप”

महाराणा प्रताप यांची आज तिथीप्रमाणे जयंती आहे. या निमित्त त्यांना वाहिलेली ही शब्दांजली.
महाराणा प्रताप यांना विनम्र अभिवादन.
— संपादक

महाराणा प्रताप
शूरवीर राजपूत
देश प्रेमाची पराक्रमी
तेवती ज्योत IIधृII

मेवाड सूर्यवंश
जन्मले राजघराण्यांत
माता जयवंताबाई
पिता उदय सिंह होत
वावरायाचे नरेश
सदा जनसामान्यांत II1II

सुपुत्र राणांची देह यष्टी
राहे बलदंड
दांडपट्टा घोडे स्वारी
युद्ध शास्त्र निपूण
वाढले भिल्ल
सवंगड्याचे सहवासांत II2II

दोन अवजड तलवारी
भाला राहे बाळगून
थरकाप उडे शत्रूला
त्यांची होती दहशत
चेतक अश्वानं त्यांना
दिली सर्वथा साथ II3II

मोजक्या सैन्यासह
लढले प्राणप्रणानं
ऐतिहासिक लढाई
झाली हळदी घाटीत
राज्य स्थापिले
दिवेरची लढाई जिंकून II4II

अतुलनीय साहसे
लढले मर्दपणानं
स्वातंत्र्य प्रेमासाठी
अर्पिले निस्वार्थ जीवन
प्रेरणादायी आदर्श वीरांना
करू वंदन II5II

अरुण गांगल

— रचना : अरुण गांगल. कर्जत. रायगड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माधव गोगावले : कोरेगाव बुद्रुक ते शिकागो !
Shashikant Oak on कथा : २
उज्ज्वला केळकर on काही कविता
उज्ज्वला केळकर on काही कविता
उज्ज्वला केळकर on ‘स्नेहाची रेसिपी’ – १७
सौ. वर्षा महेंद्र भाबल. on स्वातंत्र्यवीर सावरकर जीवनक्रम