ज्या गृहनिर्माण संस्था चांगले उपक्रम राबवित असतात, आपल्या बरोबरच इतरांचे जिणे आनंददायी होईल, यासाठी प्रयत्न करीत असतात, अशा गृहनिर्माण संस्थांची माहिती देणारे “राहु आनंदे” हे एक छान सदर महाराष्ट्र टाईम्स या प्रख्यात वृत्तपत्रात प्रसिद्ध होत असते.
या सदरामुळे विविध गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी, रहिवासी यांना एकमेकांच्या कल्पक, लोकोपयोगी उपक्रमांची माहिती होऊन, त्यांचे अनुकरण करता येईल आणि त्यामुळे त्या त्या गृहनिर्माण संस्थां मधील रहिवासी अधिक सुखाने राहू शकतील. त्याच बरोबर समाजासाठी काही योगदान देऊ शकतील असे वाटते.

अशा या सदरात सोमवार, दि. 11 नोव्हेंबर 2025 रोजीच्या अंकात आमच्या मिलेनियम टॉवर्स सह्याद्री गृहनिर्माण संस्थेची छान माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. ती आपण अवश्य वाचून मिलेनियम टॉवर्स सह्याद्री गृहनिर्माण संस्था अधिक चांगली होण्यासाठी आपण काही सूचना केल्यास, काही कल्पना सुचविल्यास संस्था आपली आभारी राहीन.

महाराष्ट्र टाईम्सने त्यांच्या सदरात स्थान दिल्याबद्दल आणि अतिशय सुरेख, मुद्देसूद लिखाण केल्याबद्दल या वृत्तपत्राच्या प्रतिनिधी मनीषा ठाकूर जगताप यांचे मनःपूर्वक आभार.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800.
