अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे, मुंबई प्रदेशाच्या मध्य मुंबई विभागातर्फे खास नवरात्रीसाठी राज्यस्तरीय भव्यदिव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
एकूण नऊ दिवस, नऊ विविध विषयांवर आधारित नऊ स्पर्धा या प्रमाणे या स्पर्धेचे नियोजन करण्यात आले होते. या महास्पर्धेस केवळ महाराष्ट्र राज्यातूनच नव्हे तर संपूर्ण भारतातून तसेच परदेशातूनही उत्तम प्रतिसाद मिळाला. विविध वयोगटातील स्पर्धकांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला.
सुप्रसिद्ध लेखक, चित्रपट कलाकार, संस्थेचे संस्थापक माननीय शरद गोरे सर, संस्थेची धुरा उत्तमरित्या सांभाळणाऱ्या संस्थेच्या उपाध्यक्षा शुभांगी काळभोर तसेच आपल्या धडाडीच्या कार्याने अल्पावधीत कार्य विस्तार करून संस्थेचे नाव सर्वदूर पोचवणाऱ्या हिरकणी सौ.राजश्री बोहरा यांच्या अनमोल मार्गदर्शनाखाली मध्य मुंबई विभागाच्या अध्यक्षा सौ.प्रणाली म्हात्रे, कार्याध्यक्ष श्री.सुनील पवार, उपाध्यक्षा डॉ.अंजली पाखले, चिटणीस सौ.सविता काळे, सरचिटणीस सौ.सारिका चव्हाण तसेच मुंबई समन्वयक श्री.हिरामण सोनवणे या सर्वांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनांतून आणि मेहनतपूर्ण योगदानाने आयोजित करण्यात आलेली ही महास्पर्धा अतिशय उत्साहात आणि आनंदात यशस्वीरित्या संपन्न झाली.
– टीम एनएसटी 9869484800