महिला समानता दिनाचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबईच्या ठाणे केंद्र आणि आम्ही सिद्ध लेखिका ठाणे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच “महिलांचे अधिकार आणि हक्क” या जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख व्याख्यात्या म्हणून ऍड.निर्मला सामंत उपस्थित होत्या.
“महिलांचे अधिकार आणि हक्क” या विषयावर ऍड.निर्मला सामंत यांनी एक तास उत्स्फूर्त व्याखान दिले. अनेक क्षेत्रातील कायदेविषयक माहिती देऊन महिलांशी मुक्त संवाद साधला.
या कायदेविषयक माहिती नंतर श्रावण महिन्याचे निमित्ताने आम्ही सिद्ध लेखिका संस्थेच्या परिवारातील प्रसिद्ध निरूपणकार प्राची गडकरी यांचे “देवाचिये द्वारी” या विषयावर अतिशय रसाळ प्रवचन झाले.
हरिपाठ आणि गुरूभक्ती चे निरुपण करतांना त्यांनी एक तास भक्तीरसात सर्वांना सामावून घेतले.

यावेळी व्यासपीठावर यशवंतराव चव्हाण सेंटर, ठाणेचे अध्यक्ष श्री.मुरलीधर नाले तसेच सचिव अमोलजी नाले, ऍड.निर्मला सामंत, निरूपणकार प्राची गडकरी आणि आम्ही सिद्ध लेखिका संस्थेच्या अध्यक्षा प्रा.पद्मा हुशिंग हे मान्यवर उपस्थित होते.
तर कार्यक्रमास संस्थेच्या सचिव वृषाली राजे विश्वस्त मा. आशालता कुलकर्णी, मा.उषाताई चांदुरकर, आ.भारती मेहता, प्रा.विजया पंडितराव, शुभांगी गान सर्व पदाधिकारी आणि कार्यकारणी सदस्यांची उपस्थिती होती.

संपदा दळवी यांच्या सुरेल स्वरात सरस्वती वंदनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.
सुत्रसंचलनाची सुत्रबद्ध जबाबदारी स्वाती दोंदे यांनी सांभाळली तर खजिनदार प्रतिभा चांदुरकर यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला..
या वेळी सुप्रसिद्ध कवी आणि यशवंतराव चव्हाण सेंटर, ठाणेचे उपाध्यक्ष डॉ.महेश केळुसकर, खजिनदार नारायण जवकर तसेच इतर अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.
या कार्यक्रमासाठी वारकरी भवनचा हाॅल रसिकांनी तुडुंब भरला होता.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800