Sunday, September 14, 2025
Homeबातम्यामहिलांचे अनोखे गझल संमेलन

महिलांचे अनोखे गझल संमेलन

गझल मंथन साहित्य संस्था, कोरपना या संस्थेचे पहिले महिला गझल संमेलन नुकतेच पुणे येथे आयोजित करण्यात आले.

या समूहात खूप नामवंत गझलकार/गझलकारा यांचा समावेश आहे हे मी ऐकून होते व त्यांना पहाण्याची व ऐकण्याची खूप इच्छा मनात होती आणि सुप्त इच्छा गझल मंथन समुहाने अल्पावधीतच पूर्ण केली.

गझलकारा उर्मिलामाई बांधिवडेकर, गझलकारा शोभाताई तेलंग, गझलकारा संगीताताई जोशी,गझलकारा देवकामाई देशमुख व गझलकारा स्नेहलताई कुलकर्णी ज्येष्ठ गझलकार म. भा. सरजी, जयवंत वानखेडे , देवकुमार आदी उपस्थित होते. मला समूहातील बहुतेक सर्व सखी नवीन होत्या पण तिथे गेल्यानंतर तो नवीन पणा गळून पडला आणि आम्ही जुन्या मैत्रिणीं सारख्या एकमेकीं मध्ये मिसळून गेलो.

मी गझलक्षेत्रात नवीन पदार्पण केले पण मलाही या मुशाय-यात या मंचाने सहभागी करून घेतले. सर्व सखींनी उत्तमोत्तम गझलांचा नजराणा पेश केला. त्यात एवढ्या सगळ्या दिग्गज गझलकारां समोर आपली गझल सादर करण्याचा जो बहुमान मला मिळाला खरंच माझ्यासाठी हा अविस्मरणीय क्षण होता.

ओळख नसल्यामुळे शोभाताईंबरोबर फोटो काढू का नको या विचारात उभी असतानाच त्यांनी स्वतः बोलून फोटोमध्ये सामील करून घेतले. खरच मनाला तो सुवर्ण क्षण वाटला.

ज्येष्ठ गझलकार म. भा सरांनी मोठ्या प्रेमाने पाठीवर हात ठेवून आशीर्वाद दिला व त्यांच्यासोबतही फोटो काढला. सगळ्यांसोबत ग्रुप फोटो काढून सर्व सुवर्ण क्षणांना माझ्या मनाच्या कुपीत बंद करून एक नवीन उर्जा घेऊन घरी परतले. खरंच हा अनुभव खूप काही नवीन देऊन गेला असे मला वाटते.

असाच गझलमंथनच्या वटवृक्षाखाली प्रेमाच्या सावलीत माझी गझल बहरावी हीच सदिच्छा !

— लेखन : सौ. मेहमूदा शेख. श्रीक्षेत्र देहूगाव, पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
Prashant Thorat GURUKRUPA on असे ही होऊ शकते !
CHANDRASHEKHAR PRABHAKAR KASAR on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on अमेरिकन भारतीयांनो “रजा” घ्या !
यश चंद्रकांत करकरे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Shashikant Oak on व्यंग कथा
सौ. सुनीता नितीन फडणीस on व्यंग कथा