भरु तिच्या पंखात बळ
देवू तिला उच्च शिक्षण
सबल करुया लेकिंना
येणार नाही वाईट क्षण
मनगट करु तिचे दणकट
शिकवू तिला स्वसंरक्षण
देवू धडे ज्युडो कराटेचे
होणार नाही तिचे भक्षण
पदोपदी घाणेरड्या नजरांचा
करेल जोमाने प्रतिकार ती
भिनार नाही नराधमांना
हिमतीने धडा शिकवेल ती
द्या तिला पुर्ण स्वातंत्र्य
मना सारखे जगू द्या तिला
स्वकर्तुत्वावर करेल प्रगती
भिणार नाही मग कोणाला
जगाच्या निर्मातीचा करा अदर
घडवेल ती भविष्य उजवल
खंबीर आधाराची द्या तिला साथ
नाव लौकिक करेल होवून सबल

— रचना : अनिसा सिकंदर. पुणे
२. कामवाली मावशी
मॅडम म्हणतात
मावशी मावशी !
सर ही म्हणतात
मावशी मावशी !!
जागतिक महिला दिनी l
मांडते आमची गाऱ्हाणी l
कुणाला वाटतील रडगाणी l
पण आहे ही खरी कहाणी ll
माझ्या घरचे आवरून सारे
मालकिणींचे करते केर वारे ll
झाडू पोछा बर्तन कपडा l
सहा सात घरचे काम करून
दमतो जीव बापूडा ll
मलाही लागते भूक तहान l
चहा नाष्टा देणारी वाटते महान ll
कुणाच्या करते पोळ्या भाजी l
कधी करते पोहे उप्पीट ll
सहा सात घरचं काम l
नंतरच मला मिळे दाम ll
मी हि आहे माणूस,
मलाहि येते दुखणं l
शीण शीणवत पाहुण्यांच येणं l
बाजार, दवाखाना महत्त्वाची कामं ll
लेकरांची शाळा,
दारुड्या नवऱ्याच टूक सांभाळणं l
एखाद्या दिवशी मी दांडी मारते ll
मस्त पैकी ” छावा” पाहत बसते ll
चिडून मॅडम फोनच फोन करते l
बदला बाई पाठव म्हणते l
कशी पाठवू बदला बाई !
काम तिचं उसने !
कधी फेडू ? कशी फेडू ?
कवा पासनं ll
कौतुक करते मी पण हिरकण्यांचं l
राज्यकर्त्या, गायिका, नायिका, लेखिका,
कवयित्रींच , अंतराळात क्रीडा क्षेत्रात
गाजवणाऱ्या ललनांच ll
मावशीच योगदान
कोण जाणतय का ?
जाणतेय मी सारे पण करू कायशी ?
थोडीशी नटखट, थोडीशी कामचुकार !!
पण सर्वांना हवी हवीशी !!
मी आहे कामवाली मावशी !
मी आहे कामवाली मावशी !!
— रचना : अलका रामचंद्र मोहोळकर.
३. तेथे कर माझे जूळती
प्रेमळ भगिनी ती माहेरची,
भावंडावर प्रेमाचा वर्षाव करी.
सून ती नंतर सासरची,
दिर, जाऊ व नंणदेवर जीव लावी.
तेथे कर माझे जुळती.
उभी राहते सतत सणवाराला
अगत्य किती पाहूणचाराला
काळजी वाहे आजारपणाला
वागणूक असे व्यवहार ज्ञानाला
तेथे कर माझे जूळती.
पिढी पिढीत असते अंतर,
जून्या नव्या पिढीचे जुळवे सूर.
सदा वाहे परिस्थितीची जाण,
प्रत्येकाचा जपे स्वभाव नी नूर.
तेथे कर माझे जूळती
आखीव रेखीव दिनचर्येत कर्तव्याचे भान,
वेळेत पूर्ण करण्याचा ध्यास
कर्तव्यदक्ष आणि संयमी,
मान सन्मानाचा नसे हव्यास
तेथे कर माझे जूळती.
प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा
लागे सर्वाना तिचा लळा
वातावरण ठेवते सुंदर
गुणगुणते गाणे, सुमधूर तिचा गळा
तेथे कर माझे जूळती.
मुलाबाळांना देई शिक्षण, संस्कार
गोरगरीबांचा, कष्टकरीचाही उचले
आपुलकीने भार.
तेथे कर माझे जूळती.
गृहिणी सर्वांगीण सूदंर अशी
अशी स्त्री लाभो प्रत्येक घरी
हीच अन्नपूर्णा, हीच शारदा, हीच देवी
सर्व गुण संपन्न अशी ही गृहिणी
तेथे कर माझे जूळती.
तेथे कर माझे जूळती.

–– रचना : पूर्णिमा शेंडे.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
कामवाली मावशीची व्यथा ऐकून व्यथीत झालो.
खरंच कवितेतून मांडले आहे.
गोविंद पाटील नेहरूनगर जळगाव.