Wednesday, November 12, 2025
Homeकलामहिला वादक, गायिका : संगीतप्रेमी तृप्त

महिला वादक, गायिका : संगीतप्रेमी तृप्त

लता मंगेशकर, आशा भोसले या नामांकित गायिकांनी अजरामर केलेली एकाहुन एक सुंदर, श्रवणीय गाणी “रहे ना रहे हम” या कार्यक्रमात सादर करुन वादक व गायिकांनी नवी मुंबईतील गानरसिकांना तृप्त केले. प्रदीप नायरकृत पद्मावती एण्टरटेन्ट आणि अर्चना थिएटर व एकलव्य म्युझिकली मॅड यांच्या सौजन्याने या कार्यक्रमाचे आयोजन वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात नुकतेच करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वच वादक या महिला होत्या. उमा देवराज यांच्या संगीत संयोजनाखाली प्रियांका मित्रा, अनहिता श्रीवास्तव आणि इतिकार या तीन गायिकांनी हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील लता मंगेशकर व आशा भोसले यांनी गायिलेली गीते ताकदीने सादर केली.

रस्मे उलफत को निभाये, रहे ना रहे हम महेका करेंगे, ना कोई उमंग है, पिया तोसे नैना लागे रे, मेघा छाये आधी रात, आ जाने जा, दैया दैया मे कहॉ आ फसी, अब जो मिले है तो बाहोको बाहोमे रहने दे ए साजना, खतूबा, राम तेरी गंगा मैली, ये है प्यार की हथकडी ही व अशी विविध गीते ऐकून श्रोते सुखावले. या कार्यक्रमाचे शेलीदार निवेदन डॉ, धनश्री सरदेशपांडे यांनी केले.

— टीम एन एस टी ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सौ.मृदुला राजे on कॅन्सर म्हणजे “कॉमा” !