गळ्यामधे माळ दे हाता में टाळ दे
देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे
संगिताचे ज्ञान दे कंठामधे तान दे
तुझे गीत गाता यावे असे वरदान दे
मायेसाठी माय दे वारीसाठी पाय दे
तुझी कृपा कामधेनू अशी एक गाय दे
दीस भर काम दे पोटापुरता दाम दे
चिंता दूर करावया ओठी तुझे नाम दे
कष्ट आणी चार दे सोसायाला जोर दे
खांद्यावर देवा तुझ्या पालखीचा भार दे
ध्रुवा परी स्थान दे कर्णा परी दान दें
श्रावणाच्या सेवेपरी थोडसं ईमान दे
तुकोबाची वीणा दे ज्ञानिया ची करुणा दे
मूर्त डोळा पायी माथा ठेवुनीया मरण दे
मागू किती राहू दे सारे एके ठायी शोभु दे
ब्रह्मचैतन्य गुरू मला जन्मो जन्मी लाभू दे
– रचना : अरविंद ढवळीकर
सर अप्रतिम रचना
अशाच असंख्य रचना तुमच्या कडून याव्यात म्हणून देव तुम्हाला उदंड व निरोगी आयुष्य देवो
अप्रतिम 👌👌👌 नेहमी प्रमाणेच…