शिक्षणापासून वंचित असलेले उसतोड कामगार, आत्महत्याग्रस्त शेतकरी, एकलपालक, रेड लाइट एरिया व कला केंद्र यांच्या मुलांसाठी ‘माझं घर’ ही संस्था कार्यरत आहे.
या संस्थेत सध्या 38 मुलं व 13 मुली असे एकूण 51 विद्यार्थी आहेत. त्यांचे संगोपन, संरक्षण आणि शिक्षण देण्याचे कार्य ‘माझं घर’ मध्ये केले जाते. हा संपुर्ण प्रकल्प लोकसहभागातून चालवला जातो.
या प्रकल्पाची गरज लक्षात घेऊन लातूर येथील सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या महिलांची संस्था असलेल्या ‘शिवाई’ प्रतिष्ठानने कणिक मळण्याचे मशीन दिले व मुलांना मार्गदर्शन करणारा कार्यक्रम नुकताच आयोजित केला होता. यावेळी शिवाई प्रतिष्ठान च्या सह कोषाध्यक्ष सई गोरे यांनी मुलांना अभ्यासाचे महत्त्व पटवून सांगितले व पुस्तक वाचनाची सवय लावून घेण्यासाठी सविस्तर मार्गदर्शन केले .या प्रसंगी ‘शिवाई’ प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष डॉ. नीता म्हस्के, बालरोग तज्ञ यांनी या सर्व मुलांना दहावीपर्यंत मोफत आरोग्य सुविधा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला.
‘शिवाई’ प्रतिष्ठानच्या माध्यमातून मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा अतिशय मोलाचा निर्णय असल्याचे ‘शिवाई’ प्रतिष्ठानच्या अध्यक्ष उषा भोसले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. तसेच या मुलांना स्वलिखित पुस्तकांचा संच भेट दिला.
या प्रसंगी संस्थेचे संचालक श्री शरद झरे व सौ. झरे यांचा ‘शिवाई’ प्रतिष्ठानकडून सत्कार करण्यात आला. ‘शिवाई’ प्रतिष्ठानच्या ज्येष्ठ सदस्य मनीषाताई काळदाते व अनुराधा ताई देशमुख यांच्या हस्ते माझे घर संस्थेचे संचलक श्री शरद झरे यांना पीठ मळण्याचे मशीन देण्यात आले.
श्री. शरद झरे यांनी ‘शिवाई’ प्रतिष्ठानच्या मुलांच्या दृष्टीने मौल्यवान अशा तिहेरी कार्याबद्दल ‘शिवाई’ प्रतिष्ठानचे आभार मानले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाई प्रतिष्ठानच्या सचिव, डाॅ.जयश्री धुमाळ यांनी केले.
या कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष सौ. संगीता देशमुख, डॉ.नीता म्हस्के, कोषाध्यक्ष डॉ. माधुरी कदम, सहकोषाध्यक्ष सई गोरे, सहसचिव डॉ. संगीता वीर, सुरेखा गरड, अर्चना माने, उषा साठे, संध्या पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
मनापासून अभिनंदन…!!