माझा देश माझा प्राण
मला त्याचा अभिमान
हक्क कर्तव्याने युक्त
आहे आमचे संविधान
विविध जाती धर्मांना
आमच्या देशात मान
विविधतेत एकता
माझ्या या देशाची शान
तिरंगी झेंडा आमचा
मधे ते अशोक चक्र
उभा आहे तो सदैव
होणार नाही तो वक्र
केशरी रंगाने होतो
बोध त्याग नी धैर्याचा
पांढरा रंग प्रतिक
सत्य शांती प्रकाशाचा
हिरवा गडद रंग
निष्ठा आणि समृध्दीचा
निळ्या रंगाचे चक्र हे
प्रगती अन शांतीचा

– रचना : प्रा अनिसा शेख. दौंड, जि.पुणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800