तुझे हासणे म्हणजे पाऊस
तुझे लाजणे म्हणजे पाऊस
तुझे बोलणे म्हणजे पाऊस
तुझे पहाणे म्हणजे पाऊस
रुणझुण पैंजण म्हणजे पाऊस
किणकिण कंकण म्हणजे पाऊस
थरथर कर्ण फुलांची पाऊस
भुरभुर कुंतल म्हणजे पाऊस
नाजुक पाऊल वाटे पाऊस
करांगुलींची हलचल पाऊस
अधरांची कोमलता पाऊस
तन्वंगी तू म्हणजे पाऊस
काय करू मी सखे साजणी
तुझ्यात बघतो रिमझिम पाऊस
जीवनात तू आली माझ्या
सुखी सरींचा घेऊन पाऊस
— रचना : राधा गर्दे. कोल्हापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
सुंदर रचना.
तुझे असणे….तुझे बरसणे….
तुझ्यात चिबं भिजणे..
तुझ्यात एकरूप होणे…
म्हणजे पाऊस….
वेड लावून..वेडं करून…
दूर नको जाऊस…
राधा मस्त अप्रतिम कविता….