बालपणीच अंधत्व आले म्हणून दु:ख न करता सर्व अंध बांधवांसाठी आपले आयुष्य खर्ची घालणारे दत्तात्रय जाधव हे खरे समाजसेवी आहेत. त्यांचे आत्मचरित्र प्रत्येकासाठी मार्गदर्शक आहे. सुदृढ व्यक्ती आणि दिव्यांग यांची तुलना करता आपल्या बांधवासाठी पायाला भिंगरी लावून फिरणारे दत्तात्रय जाधव हे दिव्यदृष्टीचे आहेत, असे गौरवद्गार पंडीत अविराज तायडे यांनी काढले. ते सुभाषित प्रकाशन आणि एसडब्लूएस आयोजित “माझी ओळख” या दत्तात्रय जाधव यांच्या आत्मचरित्राच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन प्रसंगी नाशिक येथे बोलत होते.
राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्राचे महासचिव असलेले, लेखक दत्तात्रय जाधव याप्रसंगी म्हणाले, माझे अनुभव आणि संघर्ष लोकांना भावला म्हणूनच एका वर्षात मला दुसरी आवृत्ती प्रकाशित करावी लागली हे माझे भाग्य समजतो.
पाहुण्यांचा परिचय एसडब्लूएसचे सीईओ रघुवीर अधिकारी यांनी करून दिला. प्रकाशक सुभाष सबनीस यांनी सुत्रसंचलन केले.
यावेळी राजाराम गायकवाड, अजित कुलकर्णी, जगदिप कवाळ, रियाज तांबोळी, सुरेखा धोंगडे, पत्रकार नरेंद्र पाटील, अविनाश गोसावी आदी उपस्थित होते.

– लेखन : मुकुंद बाविस्कर. नाशिक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
Sundar