अमेरिका : एक महासत्ता
संपूर्ण जगाचे आकर्षण असलेल्या अमेरिकेविषयी मी आजच्या भागात काही मूलभूत माहिती देत आहे.
भारताच्या शोधार्थ ख्रिस्तोफर कोलंबस समुद्र मार्गे स्पेन वरून निघाला. पण त्याचे जहाज मार्ग भरकटत
११ सप्टेंबर १४९२ रोजी जगाला अज्ञात असलेल्या अमेरिकन भूमीवर पोचले.
या खंडात सब्रियन मंगोलियन वंशाचे लोक ज्यांना रेड इंडियन संबोधन्यात आले. कोलंबसने तीन वेळेस अमेरिकेची सागरी सफर केली. रेड इंडियन्सना कपटाने फसवणूक करून स्पेनच्या राणी पुढे अमेरिकेचा शोध लावला हा पुरावा दाखविण्य साठी राणी पुढे सादर केले. राणीला त्यांची दया येऊन त्यांना मुळ भूमीत सोडण्याचे आदेश दिले.
या नवीन खंडाची युरोपियन देशांना माहिती झाल्यावर सर्वानीच तिकडे धाव घेऊन आपापल्या वसाहती स्थापन केल्या. मात्र यावर ब्रिटनचे वर्चस्व होते.
ब्रिटनची वाढती लालसा, जाचक करांना कंटाळून सुरुवातीला या तेरा वसाहती एकत्र येऊन स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकले आणि 4 जुलै 1776 रोजी स्वतंत्र संयुक्त अमेरिका अस्तित्वात आली. आज ती एक जागतिक शक्तिमान अध्यक्षीय लोकशाही देश असलेली महासत्ता बनली आहे. तिच्या आर्थिक व लष्करी बलशाली ताकदीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीत सदस्यता असून तिला व्हेटोचा अधिकार मिळाला आहे.
अमेरिकेच्या शेजारी कॅनडा, मेक्सिको देश असून सागरी सीमा कॅनडा, बहामास आणि रशियाला लागून आहेत. अमेरिकेन राज्य संस्था फेडरेशन स्वरूपाची असून एकूण पन्नास राज्यांचा समावेश आहे. वॉशिंग्टन डी.सी.ही राजधानी आहे. व्हाईट हाऊस हे अमेरिकेन राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान आहे.
अमेरिकेच्या राष्ट्रीय प्रशासकीय रचनेत संसद, अध्यक्ष व न्याय ह्या तीन शाखा सत्तेचा समतोल राखीत असतात. अध्यक्ष पदाची मुदत चार वर्ष असून एका व्यक्तीस जास्तीत जास्त फक्त दोन टर्म अध्यक्ष पदी राहाता येते.
जगभरातील लोक या बलशाली देशात आपले नशीब अजमवण्यासाठी येत असतात. विस्तृत भूमी, सागरागत प्रचंड गोड्या पाण्याच्या नद्या, सरोवरे, सुपीक भूमी यामुळेच अमेरिकेतील वैभवाची चढती कमान आपणांस नेहमीच दिसून येते.
या अमेरिकेन जनतेची काही रोचक आणि गमतीशीर तथ्ये आपणा बरोबर शेअर करीत आहे. अमेरिकेत वाबाश आणि इंडीयाना मध्ये प्रथम विजेचा वापर करण्यात आला. अमेरिकन लोकांचे श्वान प्रेम सर्वश्रुत आहे. एका सर्वेक्षणानुसार अमेरिकेत 5 करोड 26 लाख कुत्रे आहेत. येथे दर सेंकदाला एक घर आगीचे भक्ष्य ठरते. अमेरिकेन लोक कागदाचा वापर सर्वाधिक म्हणजे 8 करोड 50 लाख टन करतात. दरवर्षी स्वच्छतागृहापासून किचन मध्ये सर्वत्रच कागद वापरत असतात.
1950 नंतरच्या सर्वेक्षणानुसार 40% बालकांचा जन्म अविवाहित मात्यापित्या पासून होतो ही वस्तुस्थिती स्पष्ट झाली आहे.
सर्वाधिक लोकसंख्येचे शहर न्यूयॉर्क आहे. तर दुसर्या क्रमांकावर लाॅस एंजेल्सीस आणि तिसऱ्या स्थानावर शिकागो आहे.
अटलांटा हे सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय व्यस्त विमानतळ असून दर सेकंदाला येथून आकाशात विमान झेप घेत असते.
आज भारतीयांचा अमेरिकेत टक्का चांगलाच आहे. आपल्या भारतीयांनी बुध्दीमत्तेच्या जोरावर सर्वच क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे. मात्र 1924 पर्यंत भारतीयांना नागरिकत्व घेण्याचा अधिकार मिळत नव्हता.
अद्यापही अमेरिकेत महिला राष्ट्राध्यक्ष पदापर्यंत पोचलेली नाही. आता येथेच थांबतो.
पुन्हा भेटू या पुढच्या भागात.
क्रमशः

– लेखन : डाॅ.भास्कर धाटावकर.
निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ +919869484800