शिकागो: विविध पर्यटन स्थळे
शिकागोत मोठ्या प्रमाणांत पर्यटनास प्रतिसाद मिळत असतो. जगभरातील पर्यटक या सुंदर शहराला भेट देऊन आनंद लुटत असतात. त्यातील काही ठराविक स्थळांची माहिती करून घेऊ या.
ग्रेट पार्क मधील, बकिंघम फाऊंटन हे एक प्रमुख आकर्षण आहे. येथे उन्हाळ्यात प्रत्येक तासानुसार जल शो आयोजित केला जातो. त्याचा बालबच्चे, तरूणाई, आबालवृद्ध असे सर्व जण आनंद लुटत असतात. बकिंघम फाऊंटन मिशीगण लेकच्या किनारपट्टीवर केंद्रस्थानी आहे. स्थानिकांमध्ये, तसेच देशांतर्गत पर्यटकाचे आवडते ठिकाण आहे.
दुसरे महत्वाचे ठिकाण म्हणजे भव्य गुलाबी जॉर्जिया संगमरवरीतून निर्माण झालेली फार्पोरेशन ! याचे पर्यटकांना खास आकर्षण असते. येथेही प्रत्येक तासाला पाणी, प्रकाश, आणि संगीताचा शो सुरू होतो. त्याच्या खाली भूमीगत पंप खोलीमध्ये संगणका द्वारे नियंत्रण केले जाते. येथे प्री वेडिंग तसेच मॅरेज नतंर फोटोग्राफी करीता कपल्सचे आवडीचे ठिकाण आहे.
शिकागोत अनेक वेधशाळा आहेत. तेथे हवामान आणि तत्सम बाबींवर अचूक संशोधन होत असते आणि त्यांचा अंदाज चुकत नाही. येथील विलीस टाॅवरच्या 95 मजल्यावरील स्वाक्षरी खोलीत (खरे तर प्रशस्त दालनात) काॅकटेल पार्टीचा आनंद घेता येतो.
अब्राहम लिंकन यांच्या नावाने असलेला देशातील सर्वात भव्य व सुंदर पार्क समजला जातो.
ऐतिहासिक वास्तुकला आणि जागतिक दर्जाचे वन्यजीव येथे पहावयास मिळतात. या ठिकाणी अनेक जण आपल्या प्रियजनासह संपुर्ण दिवस मौज मजेत घालवू शकतात. हा पार्क वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवस उघडा असतो.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे निवासस्थान दक्षिण साईटवर साईड पार्क मध्ये आहे. तो सायन्स अॅण्ड इंडस्ट्रीच्या संग्रहालयाच्या जवळ आहे.
अशी अनेक लोकप्रिय पर्यटन ठिकाणे आहेत. तूर्तास येथेच थांबतो.
क्रमशः

– लेखन : डाॅ.भास्कर धाटावकर.
निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800