Thursday, September 11, 2025
Homeपर्यटन'माझी कॅनडा अमेरिका सफर' ( ८ )

‘माझी कॅनडा अमेरिका सफर’ ( ८ )

शिकागोतील राहाणीमान
कॅनडावरील लेख माला लिहिताना मी मिसीसागा शहरात एका कपल्सवर साधारणत: किती खर्च येत असतो त्याचे रेखाटन केले होते. तसेच येथे शिकागोत किती खर्च येतो याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असून त्याचीही माहिती देत आहे.

आता येथेही तुम्ही मुख्य शहरात (डाऊन टाऊन) राहात असाल तर वाहतूकीवरील खर्चामध्ये बससेवा, रेल्वे, टॅक्सी इत्यादींवर खर्च होत नसल्याने अर्पाटममेंटचे भाडे 1500 अमेरिकेन डाॅलर एव्हढे असते. तर दूरच्या उपनगरात ते 1000 डाॅलर असते. संपूर्ण घराचे भाडे मुख्य शहरात किमान 2500/3000 डाॅलर पर्यंत असते आणि उपनगरात ते निम्म्याहून कमी असू शकते. थोडक्यात तुम्ही कोणत्या राज्यातील सीटीत डाऊन टाऊन कि उपनगरात राहू इच्छिता यावर घरभाडे अवलंबून असते. हाच सार्वत्रिक अनुभव असतो आणि तो सर्वत्रच लागू होतो.

मुख्य घरभाडे नतंर मेडिकल खर्च हा महत्त्वपूर्ण भाग आहे. येथे वैद्यकीय सेवा खूप महागडी नि गुंतागुंतीची असते. साधी रक्त तपासणी करावयाची असल्यास भारतीय चलनात काही हजारो रूपये खर्च येतो.(अमेरिकेन डाॅलर मध्ये 1000/1500 एव्हढा येतो) यावरून कल्पना करावी. पेशंटही डाॅक्टरांनी ट्रिटमेंट ठिक दिली नाही असे त्याला वाटले तर कोर्टात दावा दाखल करायला मागेपुढे पाहात नाही. म्हणून सर्व प्रथम इंशुरन्स काढणे खूप गरजेचे असते.

उपनगरातून कार्यालयात जाणे, तुमच्या गरजेनुसार माॅल्स, काॅस्को, हाॅटेलिंग किंवा अन्य कोणत्याही कामासाठी जाण्यासाठी स्व:ताची कार असणे ही अत्यंत गरजेची बाब आहे. कारण येथे उबर टॅक्सी बोलावणे ही सुध्दा किचकट व महागडीच ठरते. त्यामुळे कार आली कि गॅसुलिन (पेट्रोल) भरणे, टोल टॅक्स, कारचे मेंटेनन्स हे सुध्दा आलेच. पण या खर्चाकडे तुम्हाला दुर्लक्ष करून चालत नाही.

खाणे, पिणे हे सर्वस्वी तुमच्याच हाती ! घरीच भोजन व्यवस्था केली तर रेडीमेड जंक फूड पासून सुटका आणि खिशालाही ताण पडत नाही. याशिवाय पाण्याचे गरम, थंड, लाईट बील, मोबाईलसेवा, इंटरनेट, कचरा वाहून नेणारी सेवा अशा अनेक फॅक्टर्सचा समावेश असतो. या साठी भारतातून आलेली मुले, मुली सुरूवातीला पार्टनरशिप मध्ये राहून खर्चाचा भार शेअर करून हलका करतात.

हे खर्चाचे आकडे ऐकून तुम्ही एकदम दचकून जाऊ नका कारण ते सुध्दा अमेरिकेन डाॅलर मध्ये कमावीत असतात. पार्ट टाईम जॉब करून अर्थार्जन करतात नि यथावकाश आपला आशियाना मिळवितात. तर राहाणीमानाच्या खर्चाची ही गोळाबेरीज दोघांत दरमहा 2500/3000 पर्यंत येत असते.

हळु हळु बस्तान बसते. लग्न गाठी जुळल्या जातात आणि संसार वेल वाढल्यावर मोठ्या घराची गरजेनुसार निवड केली जात असते. अशी आहे सर्व साधारण कथा आहे.
क्रमश:

भास्कर धाटावकर

– लेखन : डाॅ.भास्कर धाटावकर.
निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on अमेरिकन भारतीयांनो “रजा” घ्या !
Shashikant Oak on व्यंग कथा
सौ. सुनीता नितीन फडणीस on व्यंग कथा
मितल सुहास वावेकर on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
जयश्री चौधरी मुंबई on व्यंग कथा
सचिन जगन्नाथ कांबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
नामदेव लक्ष्मण वनगुले तळा - सोनसडे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !