Friday, December 26, 2025
Homeसाहित्यमाझी बहिणाई

माझी बहिणाई

प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची आज १४२ वी जयंती आहे. त्या निमित्त ही काव्यरचना….

माझ्या बहिणाईची गाणी |
काव्य मराठीस देती संजीवनी ||

गावातील मंदिरे ह्याच होत्या शाळा |
गाणी रचुनी फुलविला काव्य मळा ||

गाणी बहिणाईची वाहता गंगेचा पाट |
मना लावी जिव्हाळा शब्द मधुर दाट ||

गाणी जुन्यात चमकती बहिणाईची |
कानी नव्याने पडती ओवी अहिराणीची ||

माती,मातीत पेरिलं अनमोल शब्दधन |
बोली अहिराणीत भरलं हे काव्यधन ||

माझ्या बहिणाईच्या गाण्यात निसर्ग प्रतिमा झिरपते |
ओव्या वाचता, वाचता त्यातुनी मज बहिणाई दिसते ||

प्रविण खोलंबे

– रचना : प्रविण खोलंबे. मुरबाड, जिल्हा ठाणे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अलका वढावकर ठाणे on माझी जडणघडण : ७८
पुष्पा कोल्हे on “अनोखी स्नेह भेट”