माझी माय गं मराठी
बोलण्यात गोडी
जशी साखरेची गोणी
सर्वांना आवडी.
माझी माय गं मराठी
तिची किती माया
करून आपलेसे ती
देई गोड छाया
माझी माय गं मराठी
तिची गोड गाणी
गाते अंगाई न ओवी
ही अमृत वाणी
माझी माय गं मराठी
तुळस अंगणी
वृंदावनी सजलेली
माथा हा चरणी.

– रचना : परवीन कौसर., बेंगलोर, कर्नाटक
खरचं मराठी ग्रेट