Wednesday, September 17, 2025
Homeयशकथामाझ्या वन्स

माझ्या वन्स

माझ्या आयष्यावर प्रभाव टाकणारी आदर्श स्त्री म्हणजे माझी नणंद अखंड सौभाग्यवती पद्मा रामकृष्ण तांबट.

हे कुटुंब अमरावतीला स्थाईक होते. बहुतेक बडोद्याला त्यांचं येणं होत असे. त्यांच्या अपंग मुलासाठी म्हणण्यापेक्षा काळजाच्या तुकड्यासाठी येत असत.

माझे नुकतेच लग्न झाले होते. त्या मला नणंद कधी वाटल्याच नाहीत. मोठ्या बहिणी सारखी माया करायच्या त्या. अतिशय हुशार होत्या .

बडोद्याला कलेचं माहेरघर म्हणतात. कलेचं माहेर हेच त्यांच जन्म गांव. त्या कलावंत होत्या. स्वेटर खूप सुबक विणायच्या. विणकामात प्रविण होत्या. अवघ्या तीन दिवसांत मोठ्ठा स्वेटर विणायच्या. बोलत असतानाही त्यांचा हात न बघता विणकाम करत असे !

त्या जगन्नमित्र ह़ोत्या. गुजराती, मराठी मैत्रिणी खूप होत्या. तसेच अमरावतीत हिंदी भाषा त्या उत्तम बोलत असत. त्यांच्या सहवासात येणाऱ्या व्यक्तीचं जीवन उजळून जात असे.

त्यांचं माझं नातं खूप जवळचं होत. त्या मला हिताच्या गोष्टी शिकवायच्या. कसं वागलं पाहिजे, आत्म परिक्षण करावं असं सांगायच्या. वयाच्या सतराव्या वर्षी आईने लेकीला सांगाव्या अशा हितावह समजावयाच्या. त्यामुळं माझ जीवन सुखाचं झालं. जेवढ प्रेम तेवढंचं रागावणं सुध्दा असे. त्या अतिशय शिस्त प्रिय होत्या..
त्यांच्याकडून मी विणकाम शिकले.

पुत्र मुख पाहायला प्रत्येक आई उत्सूक असते. पण दैवाने ते सुख त्यांना नाही दिले. तीन मुलीं नंतर झालेलं बाळ जन्मताचं अपंग होते. त्याचे ओठ, टाळू दुभंगलेली, स्वर यंत्राचा भाग दुभंगलेला होता. आतील घसा दिसत होता.

त्याची पहिली प्लास्टिक सर्जरी बडोद्याला झाली. पण दुर्दैव ! ती शस्त्रक्रिया अपयशी ठरली. मग मुंबई वाऱ्या सुरू झाल्या. त्यांचे मिस्टर, स्वतःचं काँलेज व तीन मुलीना सांभाळून, वन्सना सोबत करणे शक्य नसल्याने त्या ऐकट्याच धडपड करत. भाऊ काँलेज शिकत असल्याने तेही मदत करू शकत नव्हते.

अशा कठीण परिस्थितीत एकटी स्त्री छोट्या लेकरास घेऊन लोकलचा प्रवास करुन जे जे. हाँस्पिटलमध्ये जाई. एकुण तेवीस प्लास्टिक सर्जरी, शस्त्रक्रिया झाल्या. पण हवा तसा परिणाम झाला नाही.
कधी टाके पिकायचे, कधी तुटून पहिल्यासारखी स्थिती होत असे. इतकं अपयश येऊनही हि माऊली कधीच गळाठून गेली नाही.

हार त्यांना माहिती नव्हती. एकटीने धैर्याने, चिकाटीने स्वतःची आबाळ सहन करून मुलासाठी उभ्या होत्या.
मुलाच्या आयुष्यात जे जे भोग होते ते सहनशीलतेनं सहन करत. त्याच्या डोळ्याचे आँपरेशन करावे लागले. डोळ्याला जाड भिंगाचा चष्मा आला. कोणी देवीला दर्शनाला जायला सांगितले. तेही त्यांनी केले. राजस्थानात देवीला पांच खेटे केले. मी त्यांच्या सोबत जात असे. धन्य ती माता !

तिने काय नाही केले ? तळ हातावरच्या फोडाप्रमाणे जपून त्याला मोठ्ठा केला. तो १२ वर्षाचा झाल्यावर विकंलांग शिक्षकांकडून राजुला (मुलाच नाव) चौथ्या ईयत्तेपर्यंत शिक्षण देण्यात ही माता यशस्वी झाली. खर्च खूप झाला होता. आर्थिक परिस्थिती खालावली. त्यामुळे खंबीरपणे पतीच्या संंमत्तीने, प्रेमाच्या व्यक्तीकडून मदत घेऊन, “साहित्य सदन” हे पुस्तकाचे दुकान सुरु केले.

त्या काळात एक महिला व्यवसायात येते, ही कौतुकास्पद गोष्ट होती. प्रवाहाविरुद्ध जाऊन कोणत्याही परिस्थितीत घराला सावरणाऱ्या स्त्री शक्तीची ओळख या माझ्या सहवासात आलेल्या कर्तृत्ववान मातेमुळे मला झाली. एवढे करून ही माता थांबली नाही. मुलाच्या भविष्याची सोय करण्यासाठी गरीब घरची मुलगी पाहून तिला सत्य परिस्थिती सांगुन मुलीच्या संमतीने मुलाच लग्न करून दिलं. स्वतः सारखं सुनेला तरबेज करून. तिच्या मुलाबाळाचा आनंद बघून त्या तीन वर्षापूर्वी शांतपणे अखंड सौभाग्याचा मान घेऊन आठवणीची शिदोरी मला देऊन गेल्या.

त्या गेल्या असल्या तरी त्यांच्या बद्दल अजून लिहावे वाटते. लिहिन्यासारखं खुप काही आहे. आदर्श घ्यावा असे खूप काही आहे. तालेवार श्रीमंत घरातील ही पहिली, वहिली बेटी, वडिलांची लाडकी बेबी. पण अत्यंत कठीण परिस्थितीत धीराने, नशीबाला दोष न देता स्वतः मेहनत घेऊन, शिवणकाम करून, लोकरीचे वीणकाम करुन विकत असे. जीवनात अनेक येणारे खाचखळगे भरत, स्वतःला अस्थमाचा त्रास असतानाही, ही आई डगमगली नाही.

अनेक अडचणी झेलत राहील्या. होम सायन्सचे शिक्षण घेतले असल्याने मुळच्याच कलेत भर होती. काही नवीन शिकण्याची त्यांना आवड होती. भरतकाम सुंदर करीत. भरतकामाचे क्लास घेत.स्वतः प्लेन साडीवर डिझाईन ट्रेस करून साडी वेगवेगळ्या टाक्यांनी भरतकाम करून देत असत. संसाराला हात भार लावत. संसाराची नौका पैल तिरावर नेण्याचा प्रयत्न करत असत.

अशा सर्वांगीण सुगरण नणंदेकडुन मीही खुप शिकले. त्याचा उपयोग मी माझ्या संसारात केला. त्यांच्या तीन मुली ह्या कला शिकून स्वतःचा संसार सजवत आहेत.
बडोद्याला त्यांना चार भाऊ भावजया आहेत. या सर्वात वन्संची माझ्यावर विशेष मर्जी होती. त्यांचा मला आधार वाटे.

माझ्या जीवनात अत्यंत दुःखद घटना घडली. ह्यांना कँन्सर झाला. त्यातून बाहेर येण्यासाठी त्यांनी मला धीर दिला.  मानसिक आधार दिला. अशा ह्या माझ्या विशेष मर्जितील होत्या. म्हणून मी सर्वांगीण नणंदेचा परिचय देण्याचा प्रयत्न केला आहे.

निराश न होता आलेल्या परिस्थितीला सामोरं जाणं मी वन्संकडुन शिकले. सासर माहेरचा आब सांभाळत. हळद खाऊन केशर खात असल्याचा आव आणून, आनंदी, सदा हसतमुख राहात असत. तिन्ही मुलींना शिक्षण देताना, वन्सनी स्वतः सारखच आखून रेखून तिन्ही मुलींना आपल्या कलेचा वारसा दिला.

काँलेजमध्ये प्रोफेसर असलेल्या पतीला सर्वतोपरी मदत करून  संसाराला हातभार लावला. वेळोवेळी आपले स्त्रीधन मोडून खर्च भागवत. मुलासाठी कष्ट करीत,  एवढ्याच वर्तुळात न राहाता तेवढ्याच ऊत्साहाने आणि तत्परतेने बाहेरच्या क्षेत्रात हौसेने वावरताना दिसत.

तिन्ही मुलीनी आईचा वारसा जपला आहे. मोठी शिवणकाम तर दुसरी ब्युटीपार्लर, तिसरी निरनिराळ्या कला सादर करते. प्रदर्शनहि भरविते. आपल्या भाऊ व भावजयला आईची ऊणीव भासू देत नाहीत.
सूनबाई, सौ वन्सनी चालू केलेले “साहित्य सदन” चांगले सांभाळून प्रपंच सांभाळते. नणंदाचे मायमाहेर सांभाळते. हे सर्व सौ वन्संचे संस्कार. अश्या माझ्या वन्स  बहुगुणी, माझा आदर्श आहेत.

त्या आता आमच्यात नाहीत पण त्यांच्या आठवणी मी बकुळ फुलांसारख्या जपून ठेवल्यात. किती दिवस, वर्ष गेली तरी त्याचा सुगंध दर्वळतचं राहाणार आहे. अगदी माझ्या नंतरही ईतरांना त्याची माहिती आठवण राहील, जाणवेल म्हणून ही यशोगाथा !!!!

सुरेखा तिवाटने

– लेखन : सुरेखा तिवाटणे
– संपादन : अलका भुजबळ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं