Saturday, July 5, 2025
Homeसाहित्यमाणसं !

माणसं !

जीवनाच्या वाटेवर
साथ देतात,
मात करतात,
हात देतात,
घात करतात,
ती ही असतात….. “माणसं” !

संधी देतात,
संधी साधतात,
आदर करतात,
भाव खातात
ती ही असतात….. “माणसं “!

वेडं लावतात,
वेडं ही करतात,
घास भरवतात,
घास हिरावतात
ती ही असतात….. “माणसं” !

पाठीशी असतात,
पाठ फिरवतात,
वाट दाखवतात ,
वाट लावतात
ती ही असतात….. “माणसं “!

शब्द पाळतात,
शब्द फिरवतात,
गळ्यात पडतात,
गळा कापतात
ती ही असतात …… “माणसं “!

काडिनं देतात,
गाडीनं काढतात,
मातीत घालतात,
मातीलाही जातात
ती ही असतात …… “माणसं “!

दूर राहतात,
तरी जवळचीच वाटतात,
जवळ राहून देखील,
परक्यासारखी वागतात
ती ही असतात …… “माणसं” !

नाना प्रकारची अशी
नाना माणसं,
ओळखायचीत कशी……………..
सारी असतात आपलीच “माणसं”!

प्रा. खिल्लव सतीश

– रचना : प्रा. खिल्लव सतीश
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments