गोमंतकीय साहित्यिक आणि पत्रकार प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांच्या ‘माणसाची हाव संपणार तरी कधी? ‘ या ललित लेखसंग्रहाचे प्रकाशन मंगळवेढा (सोलापूर) येथे दामाजी एक्स्प्रेस’चे संपादक दिगंबर भगरे यांच्याहस्ते नुकतेच झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेजुरी येथील शरदचंद्र पवार महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्रमुख व ज्येष्ठ समीक्षक डॉ. अरुण कोळेकर होते
या प्रसंगी बोलताना समीक्षक प्रा. दत्ता सरगर यांनी या पुस्तकात “निसर्ग आणि मानव यांच्या ताणलेल्या संबंधांवर भाष्य करण्यात आले आहे, पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असा संदेश दिला आहे, असे मत व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर मसाप दामाजीनगर शाखाध्यक्ष प्रा. प्रकाश जडे, गोरक्ष जाधव, यतिराज वाकळे अॅड. नंदकुमार पवार उपस्थित होते. सूत्रसंचालन गोरक्ष जाधव यांनी केले.तर रेश्मा गुंगे यांनी आभार मानले.
दै. दामाजी एक्स्प्रेस’च्या रविवारच्या अंकात प्रसिद्ध होणाऱ्या ‘मना मातीचा सुगंध‘ या सदरातील निवडक लेखांचे हे पुस्तक आहे.
यावेळी प्रकाश जडे लिखीत ‘वात्सल्यसूक्त आणि संगीता माशाळ यांच्या “गावाकडचा पाऊस” या पुस्तकावर डॉ. अरुण कोळेकर यांनी सविस्तर विवेचन केले.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800