व्यसनांमुळे मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक असे एक ना अनेक दुष्परिणाम होत असतात. खरं म्हणजे हे दुष्परिणाम व्यसनी माणसास केवळ माहितीच नसतात तर तो स्वतःच भोगत असतो. तरी प्रश्न पडतो, माणूस व्यसनी का होतो ?
या विषयी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे, श्री वसंत भिमराव सुतार, समाज विकास अधिकारी, समाज सेवा विभाग, के. इ. एम रुग्णालय मुंबई यांनी.
ते गेल्या 10 वर्षापासून मुम्बई व्यसनमुक्ती केंद्र, मानसोपचार, विभाग, के. ई. एम रुग्णालय मध्ये कार्यरत असून ते व्यसनमुक्तीवर खूप छान प्रकारे मार्गदर्शन करीत असतात. न्यूज स्टोरी टुडे परिवारात श्री सुतार यांचे स्वागत आहे.
– संपादक
प्रथमत: व्यसन म्हणजे काय ? हे पाहू या.
व्यसन एक घोटाळ्यात, संभ्रमात टाकणारा, रुग्णाला हळूहळू मारणारा, भयानक असा मानसिक आजार आहे.
माणूस व्यसन का करतो ?
याची अनेक कारणे तसेच काही गैरसमज पुढीलप्रमाणे आहेत.
मौजमजा करणे, सवय, मित्रांमुळे , भूक वाढण्यासाठी, झोप येण्यासाठी, कुणीतरी करणी केल्यामुळे, भूतबाधा झाल्यामुळे, मुद्दाम लोकांना त्रास देण्यासाठी, ताकद वाढावी म्हणून, स्टॅमिना वाढवण्यासाठी, घाणी मध्ये काम करावे लागते म्हणून, सेक्स पाॅवर वाढवण्यासाठी, टेन्शन घालवण्यासाठी, ईत्यादी .
– व्यसनमुक्ती साठी बरेचदा पुढील चुकीचे उपाय केले जातात:-
बुवा बाबा, फकीर, साधू ईत्यादी कडे जाणे, अंधारे धुपारे, देव धर्म, लिंबू- नारळ, अंडी, कोरडे, बकरे, दहीभात ईत्यादी उतरवून ठेवणे. नागबळी, धार्मिक ठिकाणी ठेवणे, मारणे, उपाशी ठेवणे, बहिष्कृत करणे, वाळीत टाकणे, पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवणे, लग्न लावून देणे ईत्यादी ईत्यादी.
आजाराची लक्षणे :-
1) जास्तीतजास्त नशा करणे म्हणजेच नशेच प्रमाण वाढणे.
2) नशा नाही केल्यास त्रास होणे. उदाहरणार्थ :- झोप न लागणे, हात पाय थरथर कापणे, भिती वाटणे, कामात लक्ष न लागणे, बैचेन होणे, कानात आवाज येणे, भुते दिसणे, मेलेली माणसे दिसणे, कोणी तरी बोलवत आहे, मारायला येत आहे असे भास होणे, आजूबाजूच्या लोकांवर (विशेषता बायकोवर) संशय घेणे, फिट किंवा आकडी येणे. ईत्यादी. ड्रग्जची नशा करत असेल तर नाकातून डोळ्यातून पाणी येणे, तल्लफ येणे. ईत्यादी.
3) नशे मध्ये काय करत आहे याच भान नसणे. ( नशेत स्वतःला / दुसर्याला मारणे, आत्महत्या करणे, एखाद्याचा खून करणे ईत्यादी ) हे दुसर्या दिवशी आठवत नसणे (ब्लॅक आऊट होणे).
व्यसनी होण्याची कारणे:-
१) अनुवंशिकता
२) ईतर मानसिक आजार
३) स्वभाव दोष
४) आजूबाजूचे वातावरण
५)मित्र, पिक्चर, सिनेमा, जाहिराती ईत्यादी.
– व्यसनमुक्तीसाठी योग्य उपाय :-
मानसोपचारतज्ज्ञाकडे उपचार घेणे.
इतर पथ्यपाणी :- (योग्य औषधोपचाराबरोबर इतर उपाय)
१. कामामध्ये व्यस्त राहणे. (कामावरचा पगार बँक खात्यात जमा झाला पाहिजे किंवा घरातील जबाबदार व्यक्तीकडे जमा झाला पाहिजे. रोखीने पगार मिळाला नाही पाहिजे)
२. एक रूपया सुध्दा जवळ बाळगू नये.
३. सकाळी भरपेट नाष्टा करावा. घरातून कामावर जाताना जेवणाचा डबा घेऊन जावा. डब्यासोबत ईतर जादा खाण्याच्या वस्तू (चणे / शेंगदाणे / बिस्किट / फळे ईत्यादी ) सोबत घेवून जावावे. बाहेरचे खाऊ नये.
४. लग्न हळद, पाटर्य़ा, सण समारंभ, वाढदिवसाच्या पार्ट्या, जावळ, मुंज, बारसे, जत्रा – यात्रा, गटारी, होळी, ईत्यादी ठिकाणी / नशेचे अड्डे / दुकाने अशा ठिकाणी अजिबात जाऊ नये. किंवा नातेवाईकांनी रूग्णाला पाठवू नये.
५. नशा करणाऱ्या लोकांबरोबर कोणत्याही परिस्थितीत संगत करू नये. नशा करणारी व्यक्ती अचानक समोर आली तर काहीतरी बहाणा करून तिथून लगेच निघा.
६. काहीतरी छंद जोपासा.
तलफ आली तर काय करावे ? :-
– तलफ हि काही मिनिटांची असते .
– 1 ते 100 पर्यंत मनातल्यामनात
आकडे मोजावे
– 100 ते 1 असे उलटे आकडे मनातल्यामनात मोजावे
– डोळे बंद करून दीर्घ श्वास घ्यावा.
श्वासावर लक्ष ठेवावे. ईकडे तिकडे लक्ष देवू नये.
– बाग, चौपाटी, धार्मिक स्थळे, अन्य शांत ठिकाणी जाऊन बसणे
– गाणी ऐकणे/चित्रपट/सिनेमा/नाटके बघणे
– चांगल्या लोकांशी/मित्राशी बोलावे.
अधिक माहितीसाठी संपर्क :-
वसंत भिमराव सुतार
समाज विकास अधिकारी, समाज सेवा विभाग.
के. ई. एम. रूग्णालय, बृहन्मुंबई महानगरपालिका
परेल, मुंबई – 400 012.
भ्रमणध्वनी क्रमांक – 9773415608
भेटण्याचे ठिकाण :-
वॉर्ड नंबर 28/30 समोर, तिसरा माळा, ऑर्थोपेडिक इमारत, टाटा हॉस्पिटल समोर, के ई एम रुग्णालय, परेल, मुंबई -12.
मुंबई व्यसन मुक्ति केंद्र,
वार्ड व ओ.पी.डी. नंबर -४०,
हाडाचे के.ई.एम. हाॅस्पिटल,
दुसरा मजला, परेल, मुंबई- ४०० ० १२.
बाहय रूग्ण विभाग
(केस पेपर मिळण्याची व बाहय रुग्णांना भेटण्याची वेळ) मंगळवार, गुरूवार, शनिवार
(सकाळी 8 .30 to 10.30 am)
मंडळी, आपल्या पाहण्यात कुणी व्यसनी व्यक्ती असल्यास त्याच्या पर्यंत, त्याच्या घरच्यांपर्यंत उपरोक्त माहिती जरूर पोहोचवा.

– लेखन : वसंत भिमराव सुतार. मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
व्यसनमुक्ती वर व्याख्यान द्यायला निश्चितच वसंत सुतार सरांच्या लेखाची मदत झालीय..
यापुढे प्रत्येक व्याख्यानामध्ये उल्लेखनीय मुद्देसूद मांडणी करीता महत्त्वाचे आहेत.
माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद
गौरव आळणे
नागपूर जिल्हा संघटक
नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य
धन्यवाद
Very nice information sir 👌 I agree 💯 👍
Very good information sir 👌 I agree 💯
वसंतरावांचा व्यसनांवरील लेख खूपच छान, माहितीपूर्ण.
खुपच छान सर
Excellent information shared. It really short simple but very important. Thank you so much. Please keep on writing.
👌छान माहिती दिली 🌷👍