वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी, आकाशवाणी आणि समाज माध्यमे यांचे स्वरूप बदलत असले तरी विश्वासार्हता, अचूकता, गतिमानता, नेमकेपणा, मजकुराची परिपूर्णता अशी जी माध्यमांची मूलतत्त्वे आहेत, ती कायमच राहणार असून उलट दिवसेंदिवस या तत्त्वांचे महत्व वाढतच चालले आहे, असे प्रतिपादन न्युज स्टोरी टुडे पोर्टल चे संपादक, निवृत्त माहिती संचालक श्री देवेंद्र भुजबळ यांनी केले. लातूर येथील माध्यम वृत्तसेवा या यू ट्यूब वाहिनीने नुकतीच त्यांची मुलाखत घेतली, त्यावेळी या मुलाखतीत त्यांनी असे सांगितले. ही मुलाखत माध्यम वृत्तसेवा वाहिनीचे संपादक, स्वतः श्री गोपाळ कुलकर्णी यांनी घेतली.
या मुलाखतीत श्री भुजबळ यांनी ते बहुराष्ट्रीय कंपन्या सोडून माध्यम क्षेत्रात का, कसे आले, वृत्त पत्रकारिता, दूरदर्शन, आकाशवाणी साठी दिलेले योगदान, माहिती खात्यातील सेवा अशा विविध प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली.
मुलाखतकार श्री गोपाल कुलकर्णी हे गेली ४५ वर्षे पत्रकारितेत सक्रिय आहेत. त्यांना उल्लेखनीय पत्रकारितेबद्दल अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
विशेष म्हणजे श्री देवेंद्र भुजबळ यांच्या मार्गदर्शनानुसार श्री कुलकर्णी यांनी आधी “माध्यम वृत्तसेवा” हे वेब पोर्टल आणि ते स्थिर सावर झाल्यानंतर “माध्यम वृत्तसेवा” ही यू ट्यूब वाहिनी सुरू केली असून त्यांचे हे दोन्ही उपक्रम यशस्वीपणे घोडदौड करीत आहे.
श्री भुजबळ यांची संपूर्ण मुलाखत आपण पुढील लिंक वर क्लिक करून पाहू शकता.
आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800