आज जी काही क्षेत्रे झपाट्याने वाढत आहेत आणि ज्या क्षेत्रांमध्ये करिअर च्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत, असे एक क्षेत्र म्हणजे प्रसार माध्यमे हे आहे.
मराठी वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी, आकाशवाणी वाहिन्या, समाज माध्यमे, प्रकाशन गृहे, भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन, त्यांची विविध महामंडळे यांना मराठी भाषेवर प्रभुत्व आणि माध्यमांचे शिक्षण घेतलेले उमेदवार मोठ्या संख्येने लागत आहेत. या माध्यमांची ही गरज ओळखून ठाणे येथील विद्याप्रसारक मंडळाच्या जोशी – बेडेकर कला – वाणिज्य स्वायत्त महाविद्यालयाने मराठी भाषा, साहित्य विषय घेऊन एम.ए. करण्याची संधी ठाण्यातच उपलब्ध करून दिली आहे.
बी.ए, बी. कॉम., एम.कॉम, बी. एस्सी, एल. एल.बी तसेच पत्रकारिता करणाऱ्या, युवक – युवतींना, गृहिणींना, मराठी विषयात एम.ए. करता येईल.
प्रवेश घेण्याची अंतिम तारीख २५ जुलै २०२४ ही आहे.
अधिक माहितीसाठी मराठी भाषा विभागप्रमुख प्रा.डॉ. संतोष राणे यांच्याशी 9820176934 / 9819023904 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा किंवा santoshrane99999@gmail.com वर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800