भाग २
….लगेच लेकीला (पिंकीला) फोन केला.
लेक : अगं, आज आजीचा वाढदिवस आहे. लवकर ये ना.
मी : अग आपण संध्याकाळी केक घेऊन जाऊ या
लेक : अग आई, सगळं तयार आहे. पप्पांनी कधीच केक आणून फ्रिज मध्ये ठेवलाय.
मी : पण ….
मी : अग तू आजीला विश केलं का.?
लेक : नाही, मला मस्त सरप्राईज करायचं आहे. मी सुंदर मोठ्ठं चित्र काढून शुभेच्छा पत्र तयार केलं आहे. तू, ये, तूझी आम्ही वाट पाहतोय. पप्पा पण लवकर येणारं आहेत.
माझं मन भरून आलं. डोळे कुठल्याशा भावनेने एकदम ओले झाले. ऑफिसचे काम करतांना डोळे पाणावत होतें. काम आटपले व लगेच निघाले. निघताना लेकीबद्दल आनंद, यजमाना बद्दल आदर, आणि माझ्या मनात अपार अपराधी भावना.
एका दुकानात गेली सुदंर मोठासा मराठी हिन्दी गाण्याचा ‘कारवा’ रेडिओ घेतला. मग धावतपळतच घरी पोहोचले.
पठ्ठी माझी लेक एकदम तयारच होती.
लेक : आई, मी आजी साठी आंबावडी, बाकरवडी, बिस्किटाचा पुडा घेतला. मागे पुढे नाचत दाखवत होती. तिचा उत्साह तर ओसडंत होता.
मला तिने वाढदिवसाच्या तयारीचा पत्ता लागू दिला नाही
मी लगेच फ्रेश झाली, कपडे बदलले. नुकतीच नविन गाडी घेतली होती, मलाच चालवायला दिली.
आईला काय आनंद झाला दारातच वाट पाहत असल्यासारखी उभी. मी गाडी चालवतेचा, आईला काय अभिमान खुश झाली. माझे डोळे मिश्र भावनेनी पण आनंदाश्रूंनी भरले.
आई म्हणालीच. तरीच माझं मन म्हणतच होतं की माझा वाढदिवस लेक कशी विसरेल. मला खात्री होतीच तुम्ही येणारच.
मला ‘हुंदका’ यायचा बाकी होता.
लेकीच्या उत्साहाला बहार आला, काय आणि किती गोष्टी आजीला दाखवू असे झाले होते. शुभेच्छा कार्ड बघण्यात व दाखवण्यात दोघी गुंतल्या.
सहजच मी स्वयंपाक घरात डोकावलं नाती साठी रगडा पॅटीस, माझ्यासाठी सँडविच, मिस्टरांसाठी इडली चटणी, प्रत्येका साठी आवडतीची डिश.
मला काही सुचेना मनातच विचार नाचू लागले. मी किती सहजतेने विसरली आईचा वाढदिवस.
ऑफिसमधून घरी आल्यावर कळलेच असते आम्ही गेलोच असतो तो भाग वेगळा.
आपल्या रोजच्या कामापुढे, कर्तव्याच्या जबाबदारीमुळे, विसरलो पण ‘चक्क विसरणं’ हे चांगलं नव्हे.
उद्या मी अशीच वयस्कर झाल्यावर अशी वेळ माझ्यावर येऊ शकते. लेक सासरी गेल्यावर जर माझा वाढदिवस विसरली तर.?
आपण आपले मन शांत, आनंदी ठेवायचे. तिला तिच्या धावपळीच्या परिस्थितीत समजून घेतलं पाहिजे.
हे मनाला शिकवले पाहिजे.
सकाळी सकाळी आपणच लेकीला फोन करायचा नी तिला सांगायचं की बघ हं आज माझा वाढदिवस आहे पण तू तूझ्या धावपळीत दगदग करत भेटायला येशील तर तू तूझ्यासोयीने भेटू. आपल्या मुलांना आपण समजून घेतलंच पाहिजे.
पिढी पिढीतला फरक समजून घ्यायला पाहिजे.
मुलांना कामाच्या व्यापात अपराधी भावना वाटणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
हे काय, कुठला विचार करतेय मी, मी मलाच समज देते आहे या माझ्या मनातली पळवाट तर नाही ना.
बोलायला, विचार करायला छान जमतं.
पण त्या वयात प्रत्यक्ष …जमेल..?
मन मानेल…?
समाप्त.

— लेखन : पूर्णिमा शेंडे. मुंबई
— संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
वाह..! लेख…खुपच छान!आपण आपले मनोगत व्यक्त करायचे.. यात शंकाच नाही. पुढची पिढी, माॅर्डन” पिढी !!..मान्य आहे ..पण कितपत समजून घ्यावे….? आईवडिलांना मानाचा मुजरा…!!धन्यवाद!