आज आपल्या पोर्टल वर मालवणी कविता सादर करीत आहेत, युवा कवी योगेश कांबळी. श्री कांबळी यांनी बारावी नंतर आय टी आय केले असून सध्या ते एका खाजगी कंपनीत नोकरी करतात. तसेच महाविद्यालयीन शिक्षण सुध्दा घेत आहेत. त्यांना लेखन, अभिनय, नृत्य, निवेदन, पर्यटन आदी बाबींची आवड आहे. न्यूज स्टोरी टुडे परिवारात त्यांचे हार्दिक स्वागत आहे.
– संपादक
दरवर्षी पावसा कोकणातच भरपुर पडतस
जीव तुझो आमच्यार ओवाळून टाकतस
मिरगाच्या दिवशी जोरातच गाजतस
आवाज इतको करीत पालखीच घेवन येतस
पिवळी पडलेलो रानमळा
हिरवागार करतस डोंगरातसून
खाली येवन धबधबोच बनवतस
आटत चललेलो व्हाळ परत भरान
व्हाववतस समुद्राच्या लाटांका
उधाणव भरून आनतस
पावळेच्या पाणयान खळा भरून टाकतस
आमच्याच दारातसून शेजाऱ्याच्या
घराकडे जातस वादळवाऱ्यान
परड्यातली झाडापेडा नाचवतस
इजेचो कडकड करीत अख्खी रात गाजवतस
पाटल्या दारापासून पुढला दार
पाणयान भरतस जावचो येवचो
रस्तो दिसोनासोच करतस
कागदाचे होडये घेवन पोरांका भायर
आनतस शाळेतल्या पोरांका छत्रेतव भिजवतस
पावसाळो तु तुझ्या मनासारखो जगतस
जसो गराजतस कायम तसोच बरासतस
कमी जास्त पडलस तर शाप सराप घेतस
दरवर्षी पावसा कोकणातच भरपुर पडतस
— रचना : योगेश लवू कांबळी. नवी मुंबई
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
Dear sir / ma’am..!
Khup khup aabhar . Mazi kavita tumachya portal varati pathavali . Kharch Chhan vatal . navin yuva kalakaranna tumhi lekhanitun prasidhichya zotat ananyache kary karat yacha sarth abhiman Varato . Mala hi sandhi dilyabaddal manapasan aabhar.. ✍🏻🌹🌹