“मास्टरमाईंड” ह्या पुस्तकाचे प्रकाशन उद्या, ६ मार्च रोजी नवी मुंबईतील नेरुळ येथील एस आय ई एस कॉलेज ऑफ मॅनेजमेंट मध्ये सकाळी ९ ते ११ होत आहे.या पुस्तकाचा हा परिचय…..
“मास्टरमाईंड ” ह्या पुस्तकाची निर्मिती माझ्या आजवरच्या ट्रेनिंग करिअरमध्ये मला भेटलेल्या व्यक्ती आणि त्यांनी व्यक्त केलेले अनुभव, त्यांच्या मनातील शंका कुशंका, भीती, अनेक स्वप्ने ज्यांची पूर्तता झाली किंवा नाही झाली आणि त्यामुळे झालेले मनावर परिणाम, माझ्या अनेक पुस्तकांचे वाचन आणि विवेचन आणि अर्थातच माझ्या ट्रैनिंग नंतरचे अनेक लोकांचे आयुष्यात घडलेले चांगले बदल या वर आधारित आहे.
मी बिहेवरीयल ट्रेनर आहे व गेली कित्येक वर्ष मी हे काम अतिशय आनंदाने करत आहे. आपल्या ट्रेनिंगमुळे कैक लोकांना फायदा झाला आहे याचा मला खूप आनंद आहे. पण मला खंत वाटू लागली होती कि आपण खूप कमी जनांपर्यंत पोहोचू शकलो. मग लक्षात आले कि पुस्तकाच्या माध्यमातून जर आपले विचार व अनुभव मांडता आले तर ते कित्येक लोकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, आणि म्हणूनच मास्टरमाईंड ह्या पुस्तकाची निर्मिती झाली.ह्यात मी अनेक विषय अत्यंत सहजपणे मांडले आहेत. खोलात जाऊन विचार मांडतांना अनेक गोष्टी सांगितल्या आहेत जेणेकरून पुस्तक वाचन अतिशय रंजक होईल.
प्रत्येक विषयास मी काही प्रश्न दिले आहेत जेणेकरून वाचक आपल्या आयुष्याशी संवाद साधू शकतील आणि इतकेच न्हवे तर प्रत्येक नंतर एक मेडिटेशन ची लिंक दिली आहे जी तुम्ही YOUTUBE वर ऐकू शकता व आपल्या अचेतन मनाशी संवाद साधून प्रचन्ड यश मिळवू शकता. स्वतःच्या वृत्ती बदलून संपूर्ण जगावर हे पुस्तक एक मास्टर्स क्लास आहे. स्वतःवर पूर्णपणे ताबा मिळवून आपला भाग्योदय खेचून आणण्यासाठी. ऍमेझॉन वर सुद्धा हे पुस्तक उपलब्ध आहे, तरी वाचून प्रतिक्रिया कळवाव्या.
ह्या पुस्तकाचे प्रकाशन ६ मार्च रोजी नेरुळ येथील एस आय ई एस कॉलेज ऑफ मॅनेजमेंट मध्ये सकाळी ९ ते ११ होत आहे.
प्रवेश निशुल्क आहे पण रेजिस्ट्रेशन आवश्यक आहे
https://docs.google.com/forms/d/1Pj5Iks6CsI8fmsAjBMXTipA6g7ja0gjUSgQBEfrSofI/edit

– लेखन : वसुंधरा जक्का.
– संपादन : अलका भुजबळ. 9869484800
मास्टर माईंड हे पुस्तक नक्कीच वाचायला हवे
Congratulations to you Vasu. We are all so proud of you!
Congratulation 🎊