आपल्या पोर्टलवर, “भावलेली गाणी” या सदरात तनुजा प्रधान यांनी “एक लडकी भिगी भागिसी” या गीताचे केलेले रसग्रहण वाचून निवृत्त माहिती संचालक, साहित्य प्रेमी श्री सुधाकर तोरणे यांच्या काही आठवणी जाग्या झाल्या. त्या त्यांनी आपल्या कडे पाठविल्या आहेत. त्यांनी माहिती खात्यात १९६१ ते १९९९ अशी ३८ वर्षे विविध पदांवर सेवा बजावली आहे. श्री तोरणे साहेबांचे मन:पूर्वक आभार….
अमेरिकेतील तनुजा प्रधान यांचा “भावलेली गाणी ” सदरातील “एक लडकी भिगी भागीसी” गाण्यावरील लेख आवडला. आर.डी.आणि किशोरकुमार यांच्या उत्तम कलेचे केलेले शब्दांकन फारच छान वाटले. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
या निमित्ताने एक आठवण सांगाविशी वाटते. माझ्याकडे मुंबईत, साधारण १९९५-९६ च्या दरम्यान मी उपसंचालक (वृत्त) असतांना माझ्याकडे महाराष्ट्र लाँटरीचा (उपसंचालक, लॉटरी) हा चार्ज होता. मला हे गाणं आणि तो सीन खुपच आवडला होता. या गीतावर आधारित राज्य लाँटरीचे रेडिओ साठी जिंगल व दुरदर्शन साठी, चाल तीच ठेवून जाहिरात पट तयार करून घ्यावा असे मला वाटले.

त्यावेळी बी आर चोप्रा ग्रुपचे सहाय्यक दिग्दर्शक रवी चोप्रा यांचे जाहिरात पट निर्मितीचे काम शिखरावर होते. मी त्यांना भेटलो व त्यांना ही थीम आणि गाण्यावर चांगला जाहिरात पट करण्याची विनंती केली. त्यांनी ते गाणं व चित्रण फारच छानपैकी दिग्दर्शित केलं. तो जाहिरात पट त्याकाळी खुपच गाजला.
त्यावेळी राज्य लाँटरी व अल्पबचत खात्याचे संचालक कॅप्टन श्री शुळ साहेब होते. त्यांनाही ही कल्पना खुप आवडली .
जिंगलच्या ओळी त्यांनीच त्या गीताप्रमाणे लिहिल्यात. त्यामुळे माझे काम सोपे झाले. असो….
तनुजा प्रधान यांचे हेच काय, यापूर्वीचे पाचही लेख मला आवडले. त्यांचे लेख मी नेहमीच उत्सुकतेने वाचतो. त्या सर्व लेखांचे आणि विशेषतः या लेखाचे संपादन देवेंद्रजी आपण कुशलतेने केलेले आहे त्याबद्दल आपले आणि लेखिका तनुजाजींचे मनःपूर्वक अभिनंदन.

रवी चोप्रा यांचे छायाचित्र
सौजन्य : विनय वैराळे
– लेखन : सुधाकर तोरणे. निवृत्त माहिती संचालक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
सर, आपली ही प्रतिक्रिया आणि त्यासोबतची आठवण वाचून प्रचंड आनंद झाला! आपले लिखाण कोणाच्या तरी मनाला भावले आणि अनुभवलेल्या जुन्या आठवणींची अत्तर-रुपी कुपी उघडली की त्याची पुरेपूर पोचपावती मिळते याचा अनुभव आला. आपल्या प्रतिक्रियेने लिहिण्यास खूप प्रोत्साहन दिले. आपले मनापासून खूप खूप धन्यवाद!🙏🌹🙏