Home लेख “माहिती”तील आठवणी ( १९ )

“माहिती”तील आठवणी ( १९ )

1

उत्तर प्रदेश चे माजी मुख्यमंत्री, माजी संरक्षणमंत्री मुलायमसिंह यादव यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या विषयीच्या काही आठवणी जागवल्या आहेत, निवृत्त वरिष्ठ सहायक संचालक श्री निरंजन राऊत यांनी.
श्री मुलायमसिंह यादव यांना आपल्या पोर्टल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
– संपादक

मी माहिती व जनसंपर्क विभागात संपर्क अधिकारी असताना उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री असलेले मुलायमसिंह यादव उद्योजकांना भेटण्यासाठी मुंबईत आले होते. येथील ताज हॉटेलमध्ये त्यांचे वास्तव्य होते. त्यावेळी त्यांचा पत्रकारांशी संपर्क साधण्यासाठी मला तेथे नियुक्त करण्यात आले होते. त्यानिमित्ताने त्यांच्याशी थेट बोलण्याचा मला योग आला.

त्यावेळी एका हिंदी भाषिक वरीष्ठ पत्रकाराने मराठी पत्रकारांशी त्यांची भेट होऊ नये तसेच एका मोठ्या वृत्त संस्थेच्या पत्रकाराशी संपर्कच होऊ नये अशी योजना करून ठेवली होती. मा मुलायमसिंह यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात व पत्रकार परिषदेतही मराठी पत्रकारांची तसेच त्या विशिष्ट वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधींचे नाव नव्हते. मला त्यांच्या खाजगी सचिवांनी संबंधित कागद देऊन पत्रकारांशी संपर्क साधायला सांगितले. मी याबाबत थेट मुलायमसिंह याना भेटून हे बरोबर नसल्याचे त्यांना सांगितले. त्यावेळी त्यांनी या बाबत दिलगिरी व्यक्त करून मलाच पत्रकारांची सूची तयार करून निमंत्रणही देण्यास सांगितले.

विशेष म्हणजे महाराष्ट्रात तर मराठी पत्रकारांना प्रामुख्याने निमंत्रण दिले जावे असे आदेशही त्यांनी खाजगी सचिवांना दिले आणि त्यांना बजावले की, “मराठी भाषा, हिंदी भाषा को मैं मेरी अपनी मानता हू. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र का सांस्कृतिक संबंध देखते आम मराठी पत्रकार भाई मेरे साथ बातचीत करे तो मुझे बहोत खुशी होगी”.
त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत खूप पत्रकारांशी त्यांचा सुसंवाद घडला.

विशेष म्हणजे Bomay Times चे मराठी भाषिक पत्रकार स्व सुहास फडके यांनी घेतलेली मुलाखत अनेकांना खूप भावली.
मुलायमसिंग यादव यांच्या व्यापक भूमिकेमुळे माझा त्यांच्या विषयीचा आदर द्विगुणित झाला. त्यामुळे हा प्रसंग माझ्या स्मरणात कायमचा कोरला गेला आहे.
त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली.

निरंजन राऊत

– लेखन : निरंजन राऊत
निवृत्त वरिष्ठ सहायक संचालक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️9869484800

1 COMMENT

  1. मुलायमसिंग यादव यांच्या एका चांगल्या पैलूचे दर्शन घडले.
    परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो , ही प्रार्थना .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version