सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्य क्षेत्रात काम करून समाजाचे कल्याण करणाऱ्या व्यक्तींना छ्त्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर बलवंतराव वराळे मेमोरियल फाउंडेशन दरवर्षी सन्मानित करीत असते.
यंदा मिर्झा अब्दुल कय्यूम नदवी यांना शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल, आशा सिरसाठ यांना सामाजिक कार्याबद्दल आणि शिक्षण, साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल विद्यासागर डोरनाळेकर यांना फाउंडेशनने डॉ नांदापुरकर सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात “हम भारत के” पुरस्कार देऊन या फाउंडेशनने डॉ नांदापुरकर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नुकतेच सन्मानित केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर राजेंद्र गोणकर होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मालती वराळे यांनी भूषवले.
छ्त्रपती संभाजीनगर येथीलच मिर्झा अब्दुल कय्यूम नदवी हे त्यांच्या रीड अँड लीड फाउंडेशन मार्फत रस्त्यावर, झोपडपट्टीत आणि गरीब वस्त्यांमध्ये राहणाऱ्या मजुरांच्या मुलांसाठी मोहल्ला बाल पुस्तकालय अभियान चालवतात.
या पुरस्काराविषयी आपल्या भावना व्यक्त करताना मिर्झा अब्दुल कय्यूम नदवी म्हणाले, “देशाची एकात्मता, एकता आणि बंधुता जोपासण्यासाठी सर्व भारतीयांमध्ये ‘हम हिंदुस्तान के लोग’ असल्याची भावना निर्माण होण्याची गरज आहे.
तिन्ही पुरस्कार विजेत्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना फाउंडेशनचे आभार मानले आणि भविष्यात आणखी काम करण्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे संचालन सचिव सुधा वराळे आणि मनीषा घाटगे यांनी केले. वर्षा घोबळे यांनी बलवंतराव वराळे यांच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाची प्रस्तावना ऍडव्होकेट इंदुमती वराळे यांनी केली.
चेतन चोप्रा, कुणाल वराळे आणि अजय देहे यांनी परिक्षीत वराळे, धम्मा वाहुल, बुद्धभूषण मोरे, अभिषेक सोराडकर आणि पृथ्वी मागरे यांच्यासह कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. सुनीता घाटगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
मिर्झा अब्दुल कय्यूम नदवी यांना आता पर्यंत अमेरिकन फेडरेशन ऑफ इंडियन ओरिजन्स मुस्लिम संस्थे तर्फे “सोशल एक्सलन्स अवार्ड” (रोख रक्कम एक लाख रुपये), सौदी अरब तर्फे शान – ए-औरंगाबाद अवार्ड, एसोसिएशन ऑफ मुस्लिम प्रोफेशनल्स मुम्बई तर्फे नॅशनल अवार्ड फार सोशल एक्सलन्स 2021 आणि अन्य अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800