प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशस्वी झालेल्या आणि युवकांना प्रेरणादायी ठरणाऱ्या ३५ यश कथा असलेले “आम्ही अधिकारी झालो” हे पुस्तक लिहिल्याबद्दल, पुस्तकाचे लेखक श्री देवेंद्र भुजबळ यांचा शाल, श्रीफळ देऊन मिशन आयएएस चे विभागीय संचालक श्री रुपेश राठी यांनी नुकताच अकोला येथे सत्कार केला. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे निवृत्त लेखापाल श्री प्रनील रोडे हे ही उपस्थित होते.
सत्कारानंतर श्री रुपेश राठी यांनी मिशन आयएएस चे संचालक, प्रा डॉ नरेशचंद्र काठोळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली
मिशन च्या अकोला शाखेचे काम काज कसे सुरू आहे, याची सविस्तर माहिती दिली.
तर श्री देवेंद्र भुजबळ यांनी पुस्तक लिहिण्यामागची प्रेरणा आणि पुस्तकातील नायक, नायिका यांची माहिती दिली.
अल्प परिचय
शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची माहिती व्हावी, त्यांनी शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षांचे ध्येय निश्चित करावे, त्यासाठी नियोजनबध्द प्रयत्न करावेत यासाठी मिशन आयएएस गेली २० वर्षे कार्यरत आहेत. विविध यशस्वी झालेल्या उमेदवारांची संवाद सत्रे आयोजित करणे, गावोगावी व्याख्याने देणे, उन्हाळी निवासी शिबिरे आयोजित करणे, पुस्तके प्रकाशित करणे असे विविध प्रकारचे उपक्रम मिशन आयएएस नियमितपणे आयोजित करीत असते.
— टीम एन एस टी.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
भुजबळजी,आपले मनापासून अभिनंदन
समाजाप्रती युवकांसाठी हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शन करेल यात शंका नाही.माननीय देवेंद्र भुजबळ यांना अनेक शुभेच्छां व खास अभिनंदन.
हार्दिक अभिनंदन देवेंद्र भुजबळ सर. अतिशय स्तुत्य कार्य केले आहेत. त्यासाठी मनापासून कौतुक व धन्यवाद. 🙏💐
श्री देवेंद्रजी
अनेक शुभेच्छांसहित अभिनंदन…
मनापासून अभिनंदन, देवेंद्र साहेब…!!
खूप खूप अभिनंदन,काका
आदरणीय संपादक साहेब
देवेंद्रजी भुजबळ
मनापासून अभिनंदन व शुभेच्छा!
गोविंद पाटील सर जळगाव.