अमरावतीची डॉक्टर पंजाबराव देशमुख अकादमीचा “मिशन आयएएस” उपक्रम दुसऱ्या वर्गापासून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे धडे देऊन त्यांना उत्तम नागरिक घडविण्याचे काम करीत आहे. या उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले पाहिजे. अशा कार्याला समाजाने तन-मन-धनाने सहकार्य केले पाहिजे, असे आवाहन पुणे येथील प्रसिद्ध शासकीय प्रशिक्षण शिखर संस्था यशदाचे महासंचालक डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांनी नुकतेच नागपूर येथे बोलताना केले. शासकीय प्रशिक्षण केंद्र,
“वनामती” या प्रशिक्षण संस्थेच्या स्व. वसंतराव नाईक स्मृती सभागृहात ते मिशन आयएएसच्या पदाधिकाऱ्यांशी बोलत होते.
डॉ कलशेट्टी पुढे म्हणाले, शालेय जीवनापासूनच
विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करायला लागला तर टप्प्याटप्प्याने त्याचा अभ्यास होत जाईल व भविष्यात येणाऱ्या कोणत्याही स्पर्धे परीक्षेला तो यशस्वीपणे सामोरे जाऊ शकेल. स्पर्धा परीक्षेत कदाचित तो उत्तीर्ण होऊ शकला नाही तरी शालेय जीवनापासून त्याने केलेल्या तयारीमुळे तो एक उत्तम नागरिक इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये समर्थपणे काम करू शकेल.
याप्रसंगी नागपूर येथे मिशन आयएएस सुरू करण्यासाठी स्वतःची वीस एकर जागा उपलब्ध करून देणाऱ्या नागपूरच्या डॉ. विजय घुगे यांचा गौरव करून त्यांनी समाजामध्ये अशी दानशूर माणसे असल्यामुळेच सामाजिक संस्था टिकून आहेत असे गौरवद्गार काढले.
प्रारंभी प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी त्यांचे “मी IAS अधिकारी होणारच” हे पुस्तक देऊन तर प्रशासनातर्फे श्री पटले यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ कलशेट्टी यांचे स्वागत केले. तसेच मिशन आयएएसने दुसऱ्या वर्गापासून तयार केलेली स्पर्धा परीक्षेची पुस्तके उपस्थितांना भेट देऊन सांगितले की, आज घडीला हे मिशन राज्यातील ४३ हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले असून या उपक्रमाचा लाभ अधिकाधिक मुलांनी घ्यावा, यासाठी मिशन सतत प्रयत्नशील आहे.
यावेळी नागपूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कमलकिशोर फुटाणे, नागपूर विभागाचे विकास उपायुक्त श्री इलमे, पुणे येथील राजपत्रित अधिकारी श्री बाळासाहेब जगताप, मिशन आयएएसचे नागपूर विभागाचे पदाधिकारी व हर्ष फाउंडेशनचे अध्यक्ष श्री हर्ष यादव, उत्कर्ष बँकेचे श्री कुणाल देशमुख, डॉ विजय घुगे वनामतीचे श्री मोहरील व प्रशिक्षण केंद्रातर्फे श्री पटले हे उपस्थित होते.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800
छान सर