लोकप्रिय, सदाबहार अभिनेता ऋषी कपूर याने ३० एप्रिल २०२० रोजी खूपच लवकर एक्झिट घेतली. त्याला जाऊन आज २ वर्षे पूर्ण झाली.
ऋषी कपूर चे कर्ज, सागर, ये वादा राहा असे किती तरी चित्रपट आहेत, जे कितीही वेळा पाहिले तरी मन भरत नाही. माझा सर्वात आवडता हिरो असलेल्या
ऋषी कपूर चे सेकंड इंनिंगचे पण वेगवेगळे रोल, जसे अग्निपथ, १०२ नॉटआउट असे आहेत.
पण मला ऋषी आवडतो तो ७०, ८० आणि ९० च्या दशकातला. सुरवातीला अक्षरशः १९७३ ते १९९८ असा २५ वर्षांचा “रोमँटिक हिरो” चा त्याचा रेकॉर्ड कोणी मोडू शकलेले नाही .
चाळीशी नंतरही चांदणी, बोल राधा बोल, दिवाना हे ऋषीचे चित्रपट सुपरहिट झाले. १९९७ नंतर आपली रोमँटिक इमेज सूट होत नाही हे लक्षात आल्यावर त्याने, संबंधित निर्मात्यांकडून त्यांच्या आगामी चित्रपटांसाठी घेतलेली साइनिंग अमाऊंट परत देऊन टाकली आणि कॅरॅक्टर रोल करणे सुरू केले, जे २०१९ पर्यंत तो करत राहिला.
अशा या जबरदस्त ग्रेट ऍक्टरला जाऊन आज २ वर्ष पूर्ण झालीत पण आजही…
“मेरी उमर के नौ जवानो”,
“ओ हंसनी कहा उड चली”
“क्या मौसम है” ही त्याच्यावर चित्रीत झालेली गाणी फ्रेश वाटतात, ती ऋषी च्या अदाकारीने.
जाता जाता एकच बोलावसं वाटतं,
मिस यू, ऋषी…..😢
– लेखन : संदीप भुजबळ.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ ९८६९४८४८००
Charming Hero
आपण माझा लेख प्रकाशित करून मला सन्मान दिला मी आपला व न्युज टुडे टीम चा आभारी आहे