मी असा हा अनवाणी
तू करू नको साथ राणी
आणून डोळ्यात पाणी
गाऊ नको ही गाणी
तुझ्या हळव्या या बोलानी
पान्हावते माझी पापणी
करू नको पोरकी वाणी
तुझ्या पावसाळी शब्दांनी
कधी येतील आठवणी
तेव्हा नको होऊ दिवाणी
आवाज ऐकण्यापुर्वी कोणी
तोड पायातल्या पैजनी

– रचना : दीपक शेडगे.
🌹खूप भारदस्त कविता 🌹
दीपक शेडगे साहेब धन्यवाद
अशोक साबळे
Ex. Indian Navy
अंबरनाथ