तू असशील जर
मी नसेन जर
जरा जरा जरी
असशील जर्जर
डोळ्यामध्ये नकोच पाणी
कंठी नच ते कटु स्वर वाणी
नसेल राजा नसेल राणी
मनात भरले प्रेम असे जर
तसे तसे तर तसे तसे
असे असे तर असे असे
सुखी असे मी जसे तसे
मनात अक्षय प्रेम वसे
नको नको ते आठव पुसता
आठवणी आनंदे भरता
आनंदाच्या धारा वहाता
कलह कशाला निपजे
हो ला हो म्हणत असे जो
अस्तित्वाला मुके आता तो
आता तव मुखी असो हो स हो
मग तेथे सुख बरसे सर सर
आता असेल ते त्यांचे घर
हसऱ्या तार्यांचेच असो घर
मग आसू आनंदी झरझर
असेन जेथे, तिथुन बरसतील
मी असेन जर मी नसेन जर
आनंदाची असुदे झरझर
तू जरी जर्जर मी जरी जर्जर
आनंदाची असू दे झरझर
— रचना : सुनील देशपांडे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800