एक शून्य झालेय मी,
तुला वजा करून..
तूच तर होतास माझं आस्तित्त्व
माझा श्वास, माझं सर्वस्व..
तुझ्या असण्यातच सामावलं होतं
माझं अख्खं विश्व..!
तू काव्य माझ्या जगण्यातलं,
तू तार माझ्या सतारीची..
तू इंद्रधनू मम अस्मानीचा,
तू चंद्र माझ्या पौर्णिमेचा..
तू गाज माझ्या सागराची,
तू लाटा माझ्या भरतीच्या..
तू गोड संवेदना,
माझ्या तरल भावस्पर्शाची..
तूच जिवंत ठेवलं होतस मला,
तुझ्या प्रत्येक गोष्टीत..
जोडत होतास तुझा संबंध,
माझ्या प्रत्येक गोष्टीशी..!
अन् म्हणूनच…
आज तुला वजा करून,
एक शून्य झालेय मी..!!

– रचना : डॅा. मीना बर्दापूरकर. ठाणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800