Sunday, July 13, 2025
Homeसाहित्यमी का बंधनात !

मी का बंधनात !

वर्षानुवर्षे प्रत्येक मुलीच्या मनात, घर करून राहीलेल्या प्रश्नाला, बापाने दाखवून दिलेले मार्मिक उत्तर !

मुलीचा प्रश्न होता बापाला,
असंख्य बंधने माझ्या पुरती,
आवरणे सावरणे माझ्या वाट्याला,
सातचा ठोका का मला ?

सारे पटत होते बापाला,
समज द्यावी कशी मुलीला,
तू म्हणजे काचेचा ग्लास,
जीवन तुझे इभ्रती फास ।

उकडतं फार चार भिंतीत,
चल फिरु मोकळ्या हवेत,
रस्त्यात गवसे पोलादी दुकान,
उघड्यावरी सारे सामान ।

दावूनी सांगे बाप मुलीस,
पोलाद धातू कठीण फार,
ना तुटे ना झिजे उघड्यावर,
फरक ना पडे दामास ।

मग दावले सोन्याचे दुकान,
मलमली कपड्यात,
काचेच्या पेटीत,
जपून राखी दागिना सोनार ।

मौल्यवान धातू किमती,
लागू नये कुणा हाती,
लूटमार होवूनी विखरेल,
रुप अलंकारी विस्कटेल ।

फरक जाणवे मुलीस,
नम्र होई नतमस्तक,
वचन देई बापास,
राखेन अभिमानी चमक ।

शोभिवंत अंगण सवे वृंदावन,
मुकूट साजे मानी माथ्यावर,
उजळ माथी निर्मळ जीवन,
सार्थकी नाम बाप ऋणावर ।

वर्षा भाबल.

– रचना : सौ. वर्षा महेंद्र भाबल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments