Thursday, February 12, 2026
Homeसाहित्यमी कुणाला कळलो नाही !

मी कुणाला कळलो नाही !

मित्र कोण आणि शत्रू कोण
गणित साधे कळले नाही..

नाही भेटला कोण असा
ज्याने मला छळले नाही…

सुगंध सारा वाटीत गेलो
मी कधीच दरवळलो नाही..

ऋतू नाही असा कोणता
ज्यात मी होरपळलो नाही..

केला सामना वादळाशी
त्याच्यापासून पळालो नाही..

सामोरा गेलो संकटाना
त्यांना पाहून वळलो नाही..

पचऊन टाकले दु:ख सारे
कधीच मी हळहळलो नाही..

आले जीवनी सुख जरी
कधीच मी हुरळलो नाही..

कधी ना सोडली कास सत्याची
खोट्यात कधीच मळलो नाही…

मी कुणाला कळलोच नाही…!
मी कुणाला कळलोच नाही…!

सुरेश भट

– रचना : सुरेश भट.

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. 🌹हृदयस्पर्शी कविता 🌹

    अशोक बी साबळे
    Ex. Indian Navy
    अंबरनाथ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Kavitha Tenny Nadar on झेप : 11