Saturday, March 15, 2025
Homeसाहित्य  मी नेहमी आनंदी का असतो ?

  मी नेहमी आनंदी का असतो ?

नमस्कार मंडळी.
श्री सुरेश डोळसे यांचे आजचे लेखन हे काव्यरुप असून आपल्या जगण्याचं रहस्य तथा गमक नेमके काय असायला हवं ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

कवितेचे शीर्षक वाचून तुम्ही, आम्ही सर्वांनी स्वतःला तिथं असल्याचे समजून वाचावं म्हणजे आपण काय करतोय व काय करायला हवं याचा विचार करता येईल .
श्री सुरेश डोळसे यांचे, न्यूजस्टोरीटुडे परिवारात हार्दिक स्वागत करू या.
मी नेहमी आनंदी का असतो…?
– संपादक

हो कवितेच्या शिर्षकामध्येच प्रश्न दडलेला आहे…
की…
मी नेहमी आनंदी का असतो…?

मी भुतकाळ चघळत नाही…
भविष्याची चिंता करत नाही…
मी फक्त वर्तमानात जगतो
म्हणून…
मी नेहमी आनंदी असतो..!!

मी कुणाकडुन काडीची अपेक्षा करत नाही…
कुणाचा राग मनात धरत नाही…
मी सगळ्यांसाठी मन नेहमीच साफ ठेवतो
म्हणून…
मी नेहमी आनंदी असतो..!!

मी कसलाच हव्यास आणि लोभ करत नाही…
मी हायफाय राहण्यासाठी धडपडत करीत नाही… कोणासाठी कधीच दुःखाने तडफडत नाही…
साधं राहुन आपल्या माणसांत सुखानं रमतो
म्हणून…
मी नेहमी आनंदी असतो..!!

कोण काय बोलतं ह्याचा…
मी कधीच विचार करत नाही…
कोणी काहीही बोललं तरी…
पुन्हा मी ते स्मरत नाही…
माझं जीवन स्वछंदी आहे…
ते मी मजेत जगतो…
म्हणून…
मी नेहमी आनंदी असतो..!!

जगायला काहीच भौतिक…
सुख लागत नाही…
म्हणून
मी गर्वाने कधीच वागत नाही…
सगळ्यांशी मी…
प्रेमाने, आदराने, आपुलकीने बोलतो, वागतो
म्हणून…
मी नेहमी आनंदी असतो..!!

जसा जन्म शाश्वत आहे…
तसा मृत्यू देखील शाश्वत आहे…
ह्याची जाणीव मला माझ्या परमेश्वराने करून दिली आहे…
माझ्यातही दोष आहेत…
आणि
काही उणीवाही आहेत…
त्या मी वेळोवेळी 
सुधारण्याचा प्रयत्न करतो…
म्हणून…
मी नेहमी आनंदी असतो..!!

मला सर्व गोष्टी जमतातच असं नाही…
पण
त्या करण्याचा व आनंदी राहाण्याचा…
मी सातत्याने प्रयत्न करतो…
ते करताना…
मी सदैव माझ्या परमेश्वराने सांगितलेल्या…
आचार विचाराची आठवण ठेवून…
“मी नित्य आचरण करण्यासाठी…
प्रयत्न करत असतो
म्हणून…
मी नेहमी आनंदी असतो..!!

माझी कैवल्याची वाटचाल करण्यासाठी मार्ग मिळणार आहे
ही माझ्या सर्वज्ञानी केलेली ब्रम्हवाणी त्रिकालाबाधित सत्य आहे…
म्हणून
मी नेहमी आनंदी  असतो !!

सुरेश डोळसे

– रचना : सुरेश डोळसे, नाशिक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

10 COMMENTS

  1. सुंदर कविता ! हा विचार बरोबर आहे तरी प्रॅक्टिकली करायला सर्वसामान्यांना कठीण हे खरं!

  2. मी नेहमी आनंदी का असतो?
    आदरणीय कवी श्री सुरेशजी डोळसे यांची ही कविता
    मनाला खूपच भावली.जीवन अधिकाधिक सुंदर
    करण्याचा गुरुमंत्रच जणू त्यांनी या कवितेत दिलेला आहे.
    ही कविता जो कोणी आचरणात आणेल तो कोणत्याही
    संकटाकडे सकारात्मकतेने पाहील व त्याला हिंमतीने
    त्या अडचणीला सामोरं जाता येईल.दीनदु:खितांसाठी
    त्याच्या मनातली संवेदना जागी होईल व परोपकारातून
    त्यांचं जीवन अधिक आनंदी व समाधानी होईल.
    कवी श्री सुरेशजींचं व संपादक श्री.देवेंद्रजींचं खूप खूप अभिनंदन.
    राजेंद्र वाणी,दहिसर मुंबई.

  3. आदरणीय सर नमस्कार आपण सुरेश डोळे सरांची जी कविता छापून प्राधान्य दिलं त्याबद्दल प्रथमतः आभारी कविता फार सुंदर आहे कविता फक्त बारीक वाचले तर त्याचं अर्थ काढतो आणि आनंद येतो हे आनंद देण्याचं काम सुरेश डोळस सर आणि आपण आपल्या प्लॅटफॉर्मवर दिलेला आहे वाचकांच्या वतीने मी दोघांचे आभारी आहे आणि धन्यवाद

    • खूप छान मार्ग दर्शक कविता आहे सर दंडवत

  4. मनुष्याला आनंदी जगण्यासाठी काय हवंय आणि काय नकोय याची एवढ्या साध्या सोप्या सरळ शब्दात केलेली मांडणी अप्रतिम आहे. आणि यामधुनं तुम्ही ईश्वरा प्रती काय बोध घ्यायचा आहे माणसाला ते सुद्धा अप्रतिम रित्या समजून सांगितलेला आहे.💐💐🙏🙏

  5. 🌹खूप सुंदर कविता 🌹
    🌹जीवनाचा सर्व सर्व सार कवीने योग्य शब्दात नं वास्तववादी मांडला आहे. जगायचं तर आहे पण कस जगावं याच वर्णन खूप छान. 🌹
    🌹धन्यवाद सर 🌹

  6. खूप छान ,👌👌👍👍मी नेहमी आंनदी का असतो ?!खूप उत्कृष्ठ अंजन ✅✅,I like it 😃😊

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments