Friday, March 14, 2025
Homeलेखमी पोलीस अधिकारी झाले !

मी पोलीस अधिकारी झाले !

पोलीस ठाण्यात नेमणूक
नमस्कार, मंडळी.
मागच्या लेखातआपण पाहिले कि, १९८९ व १९९२ या कालावधीतील दंगलीत आम्ही केवळ बाहेरील मदत म्हणून कर्तव्य पार पाडले. पण पुढे आपण अनुभवणारच आहोत कि माझा स्वतःचा दंगल हाताळण्याचा अनुभव कसा आहे !

तर सांगण्याची गोष्ट अशी की, मी त्यावेळी विमानतळ पास सेक्शनला ड्युटीवर होते. त्याच दरम्यान मुंबईत साखळी बाॅम्बब्लास्ट झाले. त्यानंतर म्हणजे १९९३ च्या ऑगस्टमध्ये आम्हा महिला अधिकाऱ्यांची बदली मुंबईत वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये झाली.

सुरूवातीला आम्हाला अचानक झालेल्या बदलीने थोडी साशंकतः वाटली कारण विमानतळावर सर्व वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांमुळे आम्हाला आधार वाटे. माझी बदली वांद्रे पोलिस ठाणे येथे झाली.

एक गंमत सांगते, सप्टेंबर१९९३ मध्ये मी वांद्रे पोलिस ठाणे येथे हजर झाले. तर कोणीतरी मला सांगितले कि तुम्ही सहाय्यक फौजदार लवंदेना भेटा. तेंव्हा पोलिस निरीक्षक मेश्राम साहेबांनी सांगितले त्या पोलिस उप-निरीक्षक म्हणून हजर झाल्या आहेत. त्या बंदोबस्तसाठी नाहीत. (कारण त्यावेळी महिला पोलिस अधिकारी यांना पोलिस ठाणेला बंदोबस्त साठी जावे लागे). त्यांची हजरची ठाणे दैन॔दिनीत नोंद घ्या. नंतर मी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. बी. पाटील सरांना भेटले. पाटील साहेब क्राईम ब्रॅन्च गाजवलेले जाॅबांज अधिकारी असल्याचे कळले.

त्यांच्या सांगण्यानुसार तत्कालिन परिमंडळचे ७ (सध्या९ ) आदरणीय पोलीस उपायुक्त श्री.अरूप पटनायक सरांना भेटले.उपायुक्त सरांनी जुजबी माहिती विचारली. आमचे व.पो.नी.पाटील सरांना फोन करून सांगीतले “Treat them as a officer, not as a lady”. असो…

अशा प्रकारे माझे, पर्यायाने सर्व महिला अधिकाऱ्यांचे खऱ्या अर्थाने पोलिस कर्तव्य सुरू झाले. तेंव्हा माऊटंमेरी व गणपती उत्सव सुरु होते. ते उत्सव संपले. आम्ही, म्हणजे मी व माझी सहकारी सैरंध्री घाडगे आम्ही पोलिस स्टेशनला होतो. पोलीस दलात पुरुष प्रधान संस्कृती भिनलेली असल्याने कर्मचारी आम्हाला सॅल्यूट सुध्दा करत नसत. वरिष्ठांना सॅल्यूट करणे हे शिस्तबद्ध पोलिस दलाचे नियम ट्रेनिंग मध्येच शिकवतात. असो…

सुरवातीला आम्हांला वायरलेस व्हॅन ड्युटी दिली . सर्व भागाची माहिती करून घेण्यास सांगितले. नंतर ठाणे अंमलदार मदतनीस म्हणून दिले. लवकरच मला ठाणे अंमलदार कर्तव्य मिळाले. पहिल्या दिवशी रात्रपाळी ठाणे अंमलदार कडून दिवसपाळी ठाणे अंमलदार पदाचा चार्ज घेतला. व.पो.नि.सरांचे सांगण्यानुसार जनरल लाॅकअप चेक केले. तेवढ्यात भाभा हॉस्पिटलकडून ‘दाखल होण्यापूर्वी मृत्यू ‘चा (death before admission) संदेश मिळाला.

सदर गोष्ट व.पो.नि पाटील सरांना कळली. त्यांनी मला केबीनमध्ये बोलावले व अत्यंत मायेने विचारले, ‘सुनिता डेथ बाॅडीचा पंचनामा (इंक्वेस्ट) करताना भीती नाही ना वाटणार ? मी नाही म्हणून सांगताच त्यांनी दिवस पाळी पोलिस निरीक्षक श्री.सुरेंद्र पैठणकर यांना बोलावून सांगितले, तुम्ही हिचे सोबत जा व मृतदेहाचा पंचनामा कसा करायचा याबाबत मार्गदर्शन करा. मी व पैठणकर साहेब भाभा हॉस्पिटलला गेलो. पंचनामा केला. दिवसभराच्या ज्या ज्या तक्रारी आल्या त्या नोंद करून रात्री ८ वाजता ड्युटी संपल्यानंतर आकस्मिक मृत्युचा अहवाल लिहून सर्व पेपर वपोनि यांच्या सही साठी पाठविले.

दुसऱ्या दिवशी सकाळी डिमांड कर्तव्यासाठी सकाळी पोलीस ठाण्याला गेले असता वपोनि पाटील सरांनी बोलवून घेतले व सांगितले कि, ‘Its a good inquest panchnama’ व तसा रिमार्क देखील कागदपत्रावर लिहिला. मला आनंद झाला. माझा आत्मविश्वास दुणावला.

अशी झाली सुरवात पोलिस स्टेशनच्या माझ्या कामाची. पुढील लेखात आणखी अनुभव पाहू या ! धन्यवाद.

(आज हा लेख प्रसिद्ध करताना आदरणीय बी.बी.पाटील व पैठणकर साहेब हयात नाहीत याचे वैषम्य वाटते.त्यांचे स्मृतीस विनम्र आदरांजली.)

सुनिता नाशिककर

– लेखन : सुनिता नाशिककर
निवृत्त पोलिस उपअधीक्षक, मुंबई.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Shrikant Pattalwar on कविता
शिल्पा कुलकर्णी on स्नेहाची रेसिपी ५
शितल अहेर on कविता
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on महिला गाडीग्रुप : अनोखे संमेलन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १
गोविंद पाटील on महिला दिन : काही कविता
प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण on “सुवर्णधन” सन्मानित