सा क व्य व्हॉट्सॲप समूहाच्या दुसऱ्या परदेशस्थ मराठी ऑनलाईन कवी संमेलनात कवयत्री
शिल्पा तगलपल्लेवार यांच्या कवितेचे “कुटुंब रंगलंय काव्या” फेम प्रा विसुभाऊ बापट यांनी केलेले रसग्रहण…
भगुर, नाशिकचे कवी नंदन राहाणे लिहितात…
“महाराष्ट्र आपुला, भूमिपुत्र आपण,
तनाने मनाने, मराठी मराठी ||”
याच भावना केमन आयलण्डस् मध्ये राहणाऱ्या शिल्पा तगलपल्लेवार यांच्या मनातही रुजलेल्या दिसतात. म्हणूनच आपली मराठी भाषा, मराठी संस्कृती जतन करीत केमन आयलण्डस् मध्येही रुजविण्यासाठी त्या प्रयत्न करीत आहेत. कारण त्यांना गर्व आहे, मराठी असण्याचा.!
शिल्पाजी आपल्या “मी मराठी” या कवितेत म्हणतात..
“माझा मान, अभिमान मराठी आहेच शिवाय तनमनधनही मराठीच असल्याने माझ्या श्वासात, उच्छ्वासात, रक्तात, मराठीच भिनलेली आहे. इथे राहूनही सह्याद्रीचा वारा माझ्या मनात झुलतोय, कारण माझी निष्ठा मायमराठीशी, मराठी संस्कृतीशी व मातीशी आहे.” आपल्या मराठी भाषेचे माधुर्य त्यांच्यात असल्या कारणाने शिल्पा तगलपल्लेवार यांची ‘मी मराठी‘ कविता अतिशय चांगली आणि मराठी रसिकांना आवडेल अशी तयार झाली आहे.

– रसग्रहण : प्रा.विसुभाऊ बापट. मुंबई
आता प्रत्यक्ष कवितेचा आस्वाद घेऊ या...
शीर्षक : मी मराठी
मला गर्व आहे मराठी असण्याचा
अभिमान आहे महाराष्ट्रीय असण्याचा
जपते मी इथेही मराठी भाषा
रुजवीते इथेही संस्कृतीची ललाटरेषा
माझी निष्ठा माझ्या मातीशी
मला माज आहे मराठी असण्याची
मान मराठी अभिमान मराठी
माझे अवघे तनमनधन मराठी
श्वासात फुलविते मी मराठी
माझ्या कवितेत असते नेहमीच मराठी
मी रंगविते स्वप्नाची चित्रे
असते त्यात ही मराठी
माझ्या रक्ताचा रंग मराठी
श्वासातुनी माझ्या झंकारते मराठी
गौरव गाणं गाते मुखी असते फक्त मराठी
पाठी वाहते मी मराठी
ओठी असते गुणगान मराठी
माझ्या विचारांची रास मराठी
माझा श्वास मराठी, उच्छवास मराठी कणाकणात मराठी, रक्तात माझ्या मराठी
माझ्या घरी नांदते मराठी
गौरव गाणं गाते, गुणगुणते मी मराठी
मधुर बोलीचा कणखर बाण्याचा
आत्मा माझा मराठी
सह्याद्रीचा वारा झुलतो मनामनात मराठी फडकविते झेंडा,भगवा उद्धार करते मी मराठी
माझी निष्ठा माझ्या मातीशी
माझी स्फूर्ती अन माझी कीर्ती
वाहते मी आहे मराठी
भाग्य मला लाभले
या देशात ही मराठीची बीजे मी रुजविले
वाळुतही या मी मराठी पेरले
माझ्या संस्कृतीचे इथेही जतन मी केले
समुद्रापलीकडे आचार विचाराने
माझ्या मराठीला जिवंत ठेवले
जय मराठी जय महाराष्ट्र
भारत माता की जय
– रचना : शिल्पा तगलपल्लेवार, केमन आयलण्डस्
आता प्रत्यक्ष कवयत्री स्वतःची कविता सादर करताना पाहू या…
शिल्पा तगलपल्लेवार : https://youtu.be/fV1me7wFhv0
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️+919869484800
🌹वा खूपच छान 🌹
अप्रतिम
अभिमान मराठीचा
अशोक साबळे
अंबरनाथ