Monday, December 22, 2025
Homeसाहित्यमी महाराष्ट्र

मी महाराष्ट्र

वृत्त—पादाकुलक (८+८=१६ मात्रा)

बासष्टातुन त्रेसष्टाते
करे मी आज खरे पदार्पण
स्मरती मजला वीरपुत्र ते
मुक्तीसंगर कर प्राणार्पण

शिवरायांच्या संकल्पनेत
अस्तित्व मला ते जाणवले
पेशवाईत अटकेपारच
नावहि माझे पोहचवीले

पाची शाह्या पोर्तुगीजही
इंग्रज सुद्धा आले गेले
कुणासमोरच झुकलो नाही
शौर्यवान ते कामी आले

संत महंत नि कित्येक पंथ
भाषा विविधा जाती पाती
विचारवंती सुधारवादी
माझ्या देही सुखे नांदती

राजकारणी विळख्यात आज
श्वास कोंडता मी गुदमरतो
गत लौकिकास स्मरता स्मरता
आशाकिरणी पण धडपडतो

नसानसा या धमन्यांमधुनी
भारतमाता विश्वंद्य राष्ट्र
पुन्हा उमेदी सातपुड्यांनी
सह्याद्रीचा ‘मी’ महाराष्ट्र

हेमंत कुलकर्णी

– रचना : हेमंत कुलकर्णी. मुलुंड, मुंबई

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

पुष्पा कोल्हे on “अनोखी स्नेह भेट”
सौ.मृदुला राजे on माहितीतील आठवणी : 37