Monday, October 20, 2025
Homeसाहित्यमी वाचलेलं पुस्तक ( ६ )

मी वाचलेलं पुस्तक ( ६ )

अम्रुताचा घनु
“श्री ज्ञानेश्वर महाराज विरचित विरहिणीचे सविस्तर निरूपण”

1975 साली ज्ञानेश्वर माऊलीच्या जन्माला 700 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने सर्वप्रथम नागपूरला हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत नियोजनाखाली सर्व मंगेशकर भावंडांनी “अमृताचा धनु” हा कार्यक्रम संयोजित केला. त्यानंतर मुंबई पुणे आळंदी या ठिकाणी हा कार्यक्रम पुन्हा झाला. पुढे महाराष्ट्रातील काही शहरासह अमेरिकेतही संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे निरूपण प्राचार्य राम शेवाळकर यांनी केले होते. या कार्यक्रमाच्या चार भागात दोन ध्वनी फीत निघाल्या. त्यांच्या जोडीला ‘अमृताचा धनु’ हे पुस्तक प्रस्तुत करण्यात आले.

हा कार्यक्रम पुणे येथे पाहिल्यानंतर यावर आधारित पुस्तकांचा मी वेध घेत होतो. 2010 ला या पुस्तकाची दुसरी आवृत्ती निघाली. अनेक दिवस माझ्या घरच्या लायब्ररीत ते होते. दुसऱ्यांदा वाचले आता पुन्हा नऊ दहा वर्षांनी वाचले आणि लिहिण्याचा मोह झाला.

हृदयनाथ यांनी गाण्याच्या चाली पूर्णतः अर्थानुरूप बांधल्या. त्याचप्रमाणे वाद्यांचे नियोजन ही फार विचारपूर्वक केले.

लतादीदींनी आपल्या मनोगतात, माझ्या गाण्याबद्दल काय सांगू असा प्रश्न उपस्थित केला आणि प्रांजळपणाने कबुली दिली की ज्ञानेश्वरांच्या या रचना मी गायल्या नाहीत तर त्यांच्या रूपाने माझी श्रद्धा, माझ्या स्वरांच्या आधारे मी ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी अर्पण केली म्हणून लोकांना भावली.

तर आशा भोसले यांनी गंध, नाद, शब्द स्वरातून परमेश्वराची सोबत पाठीशी वाटल्याचे नमूद केले आहे.

ह्रदयनाथांचे संपूर्ण हृदगत अतिशय वाचनीय व अनुकरणीय आहे. प्रेम, भक्ती, करूणा, अभ्यास, चिंतन, मनन, ध्यान धारणा, योग, ध्यास, आंतरिक ओढ तळमळ, निष्पाप मन, सदचारित्र्य, आणि कौटुंबिक सामाजिक संस्कार, संस्कृती व गुरुकृपा यांनी एक संत निर्माण होऊ शकतो आणि त्यांच्या पश्चात त्यांचे अनुयायी त्याला प्रेषित करू शकतात. प्रतिभेचे कवच कुंडले धारण केलेला ज्ञानेश्वर मग जन्मास यावा लागतो असे सांगून ज्ञान अज्ञान हे अंतिम नसून चैतन्यमय ‘आत्मरूप’ हे अंतिम सत्य असल्याचे म्हटले आहे.

प्रा.व.दि कुलकर्णी यांनी आपल्या प्रास्ताविकात प्राचार्य प्राचार्य राम शेवाळकरांचा ‘अमृताचा धनु’ हा ग्रंथ मोठा घाटदार आणि लावण्य सुंदर आहे, निवडक विराण्या घेऊन त्याला प्रास्ताविक मंगल आणि समाप्तीचा प्रसाददान जोडून त्यांनी एक पूर्ण बंध सिद्ध केला आहे.

प्रस्तुत अमृताचा धनु हा एक निश्चित एक अपूर्व आनंदोत्सव, दिव्यांदोत्सव आहे.
प्राचार्य राम शेवाळकर यांनी माऊलीच्या काही निवडक रचना घेऊन त्यांना एक विशिष्ट आत्मानुभव सूत्रात गुंफून एक सुंदर गीतमाला सिद्ध केली. हीच माला मंगेशकर भगिनी आणि ह्रदयनाथांच्या कंठातून बरसत राहिली. ओम नमोजी आद्या या मंगलचरण प्रारंभ होऊन आता विश्वात्मके देवे या पसायदानाने या धर्म संगीताचा शेवट होतो.
एक भाव मनोहर असं संपादन निवेदन, कथन, गायन आहे. अमृताचा धनु त्यांनी नीलवर्ण भगवान श्रीकृष्णा सारखा वेध लावणारा आहे असे सूत्ररूपाने सांगितले आहे.

या पुस्तकात मोजक्या विहरणीचा समावेश आहे. त्या अशा “ओम नमोजी आद्या”।, “पैल तो गे काऊ कोकाता हे। शकुन गे माये सांगताहे”। “धनु वाजे घुणघूणा वारा वाहे रुणझुणा”। भवतारकु हा कान्हा वेगी भेटावा कां”। “रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा। सांडी तू अवगुण रे भ्रमरा”। ” “आज सोनियाचा दिनु वर्षे अमृताचा धनु” । “अरे अरे ज्ञाना झालासी पावन”। “पांडुरंगा कांति दिव्य तेज झळकती” ।”आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञे तोषावे। तोषोनी मज द्यावे पसायदान हे” अशा काही देत आहे.

या पुस्तकात सर्वच विरहणींचे प्राचार्य राम शेवाळकर यांनी फार चांगल्या रीतीने निरूपण केले आहे.सर्व गाण्यांचे निरूपण फारच मोठे होईल. विस्तार भयापोटी मी फक्त पसायदानाचा निरूपणातील काही ओव्याचा उल्लेख करीत आहे . ‘पसायदान हे ज्ञानेश्वरी मधुर फळ आहे. मुळातच ज्ञानेश्वरी एक झाड आहे .सर्व माधुर्याचे, ऐश्वर्याचे सुगंधी अत्तर पसायदानामध्ये उतरले आहे. पसायदानापूर्वी एक संपूर्ण वीरानी नमुन्यासाठी देत असून लता मंगेशकर यांचे विचारांची स्वतंत्र चौकट देत आहे .म्हणजे ‘अमृताचा धनु’ पुस्तकाची कल्पना येईल. तसेच विराणी आणि निरूपण देखील सहजपणे लक्षात येईल.

सुधाकर तोरणे

– परीक्षण : सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक नाशिक.
– संपादन : देवेंद्र भुजबळ.☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित शेट्ये on कामाख्या देवी
ॲड.श्रध्दा बापूसाईनाथ राऊळ. आरवली.. on माणसांच्या गर्दीतूनी या…!!
संदीप सुरेंद्र भुजबळ on नगर अभियंत्याचा अभंग
Dattatray Babu Satam on झेप: ६
Madhavi Sule on झेप: ६
उपेंद्र कुलकर्णी on निसर्ग  कोप
Rushikesh Canada on निसर्ग  कोप
Upendra Kulkarni on निसर्ग  कोप
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on नवरात्र : नववे रुप
Mohana Karkhanis on निसर्ग  कोप